अक्षय्य तृतीयेला सोनं-चांदी झालं स्वस्त; वाचा, कोणत्या शहरात काय आहेत बाजारभाव?

Gold and silver prices on Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला सोनं स्वस्त झालं आहे. काल सोन्याच्या भावात वाढ झाली होती. मात्र, आज त्यात सुधारणा झाली आहे. आज, ३० एप्रिल रोजी, देशभरात अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जात आहे. (silver) अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं-चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. अशा शुभ काळात, सोनं आणि चांदीच्या किमतीत थोडीशी घट झाली तरी गुंतवणूकदारांना दिलासा मिळतो. २२ एप्रिल रोजी सोन्याचे भाव १,००,००० रुपयांच्या वर पोहोचले होते. मात्र, तेव्हापासून सोनं अद्याप १ लाख रुपयांच्या पातळीवर पोहोचलेले नाही.
दिल्ली-मुंबई मध्ये सोन्याचा भाव
बुधवार, ३० एप्रिल २०२५ रोजी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ८९,९९० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ९७,०४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ८९,७५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ९७,९१० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. आज दिल्लीत चांदीचा भाव १,००,००० रुपये प्रति किलो आहे. आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चांदी कालच्या तुलनेत ५०० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
फडणवीसांचा मोठा निर्णय; पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख अन् नोकरी देणार
अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे आणि करांवरील वादामुळे सोन्याच्या किमतींमध्ये वेगाने चढ-उतार होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे भारतातही त्याच्या किमती वाढल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, जर परिस्थिती सामान्य राहिली तर पुढील सहा महिन्यांत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७५,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. पण जर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला तर त्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,३८,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते.
सोन्याची किंमत कशी ठरते?
आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती, सरकारी कर आणि रुपयाच्या मूल्यातील चढउतार अशा अनेक कारणांमुळे भारतात सोन्याच्या किमतीत बदल होतो. सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही तर ते आपल्या परंपरा आणि सणांचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः लग्न आणि सणांमध्ये त्याची मागणी वाढते.
शहराचे नाव २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
दिल्ली ८९,९९० ९८,०४०
चेन्नई ८९,७५० ९७,९१०
मुंबई ८९,७५० ९७,९१०
कोलकाता ८९,७५० ९७,९१०
जयपूर ८९,९९० ९८,०१०
नोएडा ८९,९९० ९८,०१०
गाझियाबाद ८९,९९० ९८,०१०
लखनौ ८९,९९० ९८,०१०
बेंगळुरू ८९,७५० ९७,९१०
पाटणा ८९,७५० ९७,९१०