क्रिकेटचे नियम बदलणार; 34 षटकांनंतर एक चेंडू अन् 5 बॅकअप खेळाडू ; ICC करणार मोठी घोषणा

New Rules In Cricket : आयसीसी लवकरच कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील काही नियम बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवीन नियम कसोटीमध्ये जूनपासून आणि कसोटीमध्ये जुलैपासून लागू होणार असल्याची माहिती आयसीसीकडून (ICC) देण्यात आली आहे. आयसीसीकडून एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये सर्वात मोठा बदल करण्यात येणार आहे. माहितीनुसार, आयसीसी प्लेइंग-11 च्या काही कंडीशनमध्ये बदल करणार आहे.याबाबात आयसीसीकडून सर्व सदस्यांना माहिती देण्यात आली आहे.
कोणते नियम बदलणार
सध्या लागू असणाऱ्या नियमांनुसार, एकदिवसीय सामन्यात दोन्ही बाजूने दोन नवीन चेंडू वापरले जातात मात्र आता नवीन नियमांनुसार, डावातील पहिल्या 34 ओव्हरसाठीच दोन्ही बाजूने दोन नवीन चेंडू वापरले जाणार आहे. त्यानंतर 35 व्या ओव्हरपासून डावाच्या शेवटपर्यंत दोन्ही बाजूने एकच चेंडू वापरण्यात येणार आहे. 34 ओव्हरनंतर आणि 35 व्या ओव्हरपूर्वी क्षेत्ररक्षण करणारा संघ त्या दोन चेंडूंपैकी एक निवडेल. तर दुसरीकडे जर सामना पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे 25 ओव्हर किंवा त्यापेक्षा कमी असेल तर डावात एकच चेंडू वापरण्यात येणार आहे.
तर नवीन नियमांनुसार आता प्रत्येक संघाला सामन्यापूर्वी 5 बॅकअप खेळाडूंची नावे द्यावे लागणार आहे. यामध्ये एक फलंदाज , एक यष्टिरक्षक, एक वेगवान गोलंदाज, एक फिरकी गोलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडूचा समावेश असणार आहे आणि जर बॅकअप खेळाडू देखील जखमी झाला तर मॅच रेफरीला नवीन पर्याय निवडण्याचा पर्याय असणार आहे. याच बरोबर आता सीमारेषेवरील झेल आणि डीआरएसच्या काही नियमांमध्ये देखील बदल होणार असल्याची माहिती आयसीसीकडून देण्यात आली आहे. मात्र यात कोणता बदल होणार याबाबात आयसीसीने कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
WTC फायनल जुन्या नियमांनुसार होणार
तर दुसरीकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 चा फायनल सामना जुन्या नियमांनुसार होणार असल्याची माहितीही आयसीसीने दिली आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 11 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना लॉर्ड्स येथे होणार आहे. तर नवीन नियम कसोटी क्रिकेटमध्ये 17 जूनपासून गॉलमध्ये होणाऱ्या श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यापासून लागू होणार आहे.
लव्ह जिहादचा कायदा संभाजी महाराजांच्या नावाने करा, चौंडीत आमदार पडळकरांची मोठी मागणी
तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात 2 जुलै रोजी होणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यापासून लागू होणार आहे. तर टी-20 क्रिकेटमध्ये 10 जुलैपासून नवीन नियम लागू होणार आहे. 10 जुलैला श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेती पहिला सामना होणार आहे.