लव्ह जिहादचा कायदा संभाजी महाराजांच्या नावाने करा, चौंडीत आमदार पडळकरांची मोठी मागणी

Gopichand Padalkar : राज्यात लवकरच धर्मांतर बंदी आणि लव्ह जिहाद कायदा येणार आहे. धर्मांतर बंदी कायदा राज्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने आणि लव्ह जिहादविरोधी (Love Jihad) कायदा संभाजी महाराजांच्या नावाने आणावा अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. आज आमदार पडळकर अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिर्मीत चौंडी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि विधानपरिषद सभापती राम शिंदे (Ram Shinde) देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना आमदार पडळकर म्हणाले की, राज्यात लवकरच धर्मांतर बंदी आणि लव्ह जिहाद कायदा अस्तितवात येणार आहे. यातील धर्मांतर बंदी कायदा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने आणावा आणि लव्ह जिहादविरोधात कायदा संभाजी महाराजांच्या नावाने आणावा. अशी मागणी या कार्यक्रमात बोलताना आमदार पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तसेच मुख्यमंत्री फडणवीस आरक्षणावर लवकरच मार्ग काढणार असं देखील आमदार पडळक म्हणाले.
या कार्यक्रमात बोलताना आमदार पडळकर म्हणाले की, अहिल्यादेवींची आजपर्यंत इवढी मोठी जयंती कधी झाली नव्हती. मुख्यमंत्री फडणवीस साहेब मी आज काहीच मागणार नाही. आरक्षणाचं तुमच्या मनात आहे. यासाठी देवाभाऊ लवकरच मार्ग काढतील. आरक्षणाची लढाई आम्ही कोर्टात लढत होतो तेव्हा देवा भाऊने आणि शिंदे साहेबांनी मागेल ते लिहून दिलं होतो मात्र कोर्टात निकाल आमच्या विरोधात गेला. ओबीसीचं आरक्षण गेला होता मात्र आपलं सरकार आल्यावर आहे असं थांबवलं.
दोघांनी कोर्टात आरक्षणासाठी आपली बाजू लावून धरली असं देखील गोपीचंद्र पडळकर म्हणाले. तसेच देशात होळकर घराण्यावर काही राजकारण्यांनी अन्याय केला असा आरोपही यावेळी पडळकर यांनी केला आहे. यावेळी पडळकर भावूक झाल्याचे देखील पाहायला मिळाले.