Family burnt to death while sleeping while charging car : इराण विरूद्ध इस्त्रायल-अमेरिका या युद्धाने सध्या जगभर एकच प्रश्न निर्माण केला आहे तो म्हणजे इंधन पुरवठा यावर एकच उत्तर दिलं जात ते म्हणजे इंधनावरील डिपेंडन्सी कमी करून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे त्याचबरोबर पर्यावरण पुरक म्हणून असो वा पेट्रोल-डिझेलच्या वापराला पर्याय म्हणून असो सरकार आणि विविध स्तरावरून नेहमीच इलेक्ट्रिक वाहनांचा वापराला प्रोत्साहन दिलं जातं. मात्र याच इलेक्ट्रिक वाहनांचा वापर किती जीवघेणा ठरू शकतो? याची एक काळीज पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील इंदोरमधून समोर आली आहे. घराबाहेर चार्जिंगला लावलेली इलेक्ट्रिक कार शॉर्टसर्किटने आगीच्या भक्षस्थानी पडते आणि झोपेत असलेल्या कुटुंबाला जळून खाक करते. ही धक्कादायक घटना कशी घडली इलेक्ट्रीक वाहन वापरनं खरचं सुरक्षित आहे? सर्व सर्व प्रश्नांची उत्तर सविस्तर जाणून घेऊ…
नेमकी घटना काय?
मध्य प्रदेशातील इंदोर शहरामधील बंगाली स्क्वेअरजवळ ब्रिजेश्वरी कॉलनी आहे. या ठिकाणी एका घराबाहेर इलेक्ट्रिक कार चार्जिंसाठी लावलेली होती. बुधवारी पहाटे साधारण चार वाजण्याच्या सुमारास मात्र येथे अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि कारला भीषण आग लागली. ही आग इतकी वेगाने पसरली. त्यामध्ये तिने घरामध्ये ठेवलेल्या थोड्या ना थोडक्या दहा गॅस सिलेंडर्सना तिने आपल्या विळख्यात घेतले. सिलेंडर्सनी पेट घेताच एका पाठोपाठ एक जोरदार असे स्फोट झाले हे स्फोट एवढे मोठे होते की, हा संपूर्ण परिसर हादरून गेला होता तसेच हे घरही कोसळलं होतं आणि घरामध्ये झोपलेल्या लोकांना आगीमधून बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.
या घटनेमध्ये पुगलिया कुटुंबातील तब्बल 8 जणांचा जळून मृत्यू झाला आहे. हे कुटुंबाने चार्जिंग पूर्ण झाल्यावर घरात जाऊन विश्रांती घेत होते. मात्र सर्वजण झोपेत असताना या आग लागल्याने त्यांना कळलं नाही. या घराण्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र कुटुंबाची केवळ कारच इलेक्ट्रिक नव्हती तर घराला देखील इलेक्ट्रॉनिक कुलपं बसविण्यात आली होती. आगीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाला त्यामुळे ही कुलपं उघडली गेले नाहीत. परिणामी घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे स्थानिकांना जमले नाही. तर पोलीस आले तोपर्यंत कुटुंबातील सर्व सदस्य झोपेतच जळून खाक झाले होते.
ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदेंनी कंबर कसली, अर्ध्यापेक्षा जास्त खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार?
या घटनेवर मध्यप्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी चिंता व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी म्हटले की, आज प्रत्येक जण इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. इंधन आणि जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वजण इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा विचार करतोय त्यात मीही आता तसाच विचार करणार होतो. मात्र अशा प्रकारे जर दुर्घटना घडणार असतील तर याबाबत सखोल अभ्यास होणे अत्यंत गरजेचे आहे.
सुरक्षांची उपायांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर पर्यावरण पूरक आणि इंधनांना सर्वोत्तम पर्याय म्हणून समोर येत असला तरी चार्जिंग स्टेशन, वायरिंग, सिलेंडर आणि घरातील इतर उपकरणं या सर्वांचं इलेक्ट्रिक वाहनांच्या दृष्टीने एकत्रित मूल्यांकन करणे गरजेचे आहे. तसेच या वाहनांची सुरक्षा मानकं अधिक कडक करण्याची देखील मागणी या घटनेनंतर जोर धरू लागली आहे. त्यामुळे इंदोरची ही घटना सरकारसह इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या कंपन्यांना पुन्हा एकदा विचार करायला लावणारी आहे.
