Download App

फारूख अब्दुल्लांना कलम 370 हटवल्यानंतरही भाजपसोबत जायचं होतं, मोठ्या नेत्याचा दावा

Farooq Abdullah : पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील जागावाटवरुन इंडिया आघाडीतील (India Alliance) पक्षांकडून काँग्रेस पक्षाला धक्के बसले आहेत. काँग्रेसचे जुने मित्र नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी काँग्रेससाठी नवीन संकट उभे केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) त्यांनी एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत भाजप नेते दवेंद्र सिंह राणा यांनी फारुख अब्दुल्ला यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

भाजप नेते देवेंद्र सिंह राणा म्हणाले की, फारुख अब्दुल्ला सातत्याने भाजपसोबत युती करून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते. ते म्हणाले की 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर अब्दुल्ला यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची उत्सुकता दाखवली होती. मी त्या घटनेचा साक्षिदार आहे. कलम 370 रद्द केल्यानंतरही अब्दुल्ला यांनी प्रयत्न केले होते. भाजपने अब्दुल्लांशी यापूर्वी युती केली होती. आता त्याची पुनरावृत्ती करायची नव्हती, असे त्यांनी सांगितले.

युवराज सिंगच्या घरात चोरी, मोठी रोकड आणि दागिने लंपास

भाजप नेत्याच्या या विधानामुळे जम्मू-काश्मीरमध्ये खळबळ उडाली आहे कारण भाजपची पीडीपीसोबत दीर्घकाळ युती होती. यावरुन भाजपवर अनेकवेळा टीका झाली आहे. फारुख अब्दुल्ला हे अनेक दिवसांपासून भाजपच्या विरोधात राजकारण करत असले तरी वेळोवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुतीही केली आहे, त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्सही यावरुन नाराज होऊ शकते.

दिल्लीतील आंदोलनाचा योगींना धसका ! राज्यात सहा महिन्यांसाठी संपावर बंदी

इंडिया आघाडीवर फारुख अब्दुल्ला काय म्हणाले?
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीबाबत सांगितले होते की, पक्ष जम्मू-काश्मीरमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवेल. तत्पूर्वी, टीएमसीने पश्चिम बंगालमध्ये आणि आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये लोकसभा निवडणूक एकट्याने लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपविरोधात अजेंडा ठरवताना काँग्रेसलाही धक्का बसला आहे.

दरम्यान जेव्हा भाजपची नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती होती, त्यावेळी केंद्रात भाजपचे एनडीएचे सरकार होते आणि अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते.

follow us