युवराज सिंगच्या घरात चोरी, मोठी रोकड आणि दागिने लंपास
Yuvraj Singh : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या पंचकुला येथील एमडीसी सेक्टर 4 येथील घरातून रोख रक्कम आणि दागिन्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी त्याच्या घरातून 75 हजार रुपयांची रोकड आणि दागिने चोरून नेले आहेत. या चोरीचा आरोप तेथे काम करणाऱ्या घरकामगारांवर करण्यात आला आहे. युवराज सिंगची आई शबनम सिंग यांनी खुलासा केला की, साकेतडी येथील घर कर्मचारी ललिता देवी आणि बिहारमधील स्वयंपाकी सिलदार पाल यांच्यावर संशय आहे.
पोलिसांनी तपास सुरू केला
शबनम सिंगच्या म्हणण्यानुसार, त्या सप्टेंबर 2023 पासून गुडगावमधील त्यांच्या दुसऱ्या निवासस्थानी राहत होत्या आणि 5 ऑक्टोबर 2023 रोजी जेव्हा त्या त्यांच्या पंचकुला घरी परतल्या तेव्हा त्यांच्या कपाटातून सुमारे 75,000 रुपये किमतीचे दागिने आणि इतर वस्तू गायब असल्याचे आढळले. यानंतर त्यांनी स्वतः चौकशी केली असता त्यांना कोणत्याही प्रकारचा सुगावा लागला नाही. यानंतर त्यांना कळले की ललिता देवी आणि सिलदार पाल यांनी अचानक नोकरी सोडली आणि दिवाळीच्या सुमारास राहत्या घरातून पळ काढला.
Sunflower 2 Trailer: सुनील ग्रोव्हर मारेकरी बनणार? ‘सनफ्लॉवर 2’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
शबनम सिंग यांनी दोन माजी कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त केला असून पोलिस कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी अधिकृतरित्या गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाबाबत बोलताना पोलिसांनी मीडियाला माहिती देण्यास नकार दिला. यामुळे तपासात अडथळा निर्माण होईल असे त्यांचे म्हणणे आहे.
माजी क्रिकेटपटू युवराज सिंग या प्रकरणी अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. युवराज सिंगने भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाची योगदान दिले आहे. 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
राजकोटमध्ये अश्विनने रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट घेणारा 9वा गोलंदाज