Accident : बस-कारचा भीषण अपघात; 2 चिमुरड्यांसह 10 जणांचा भीषण अपघात

Mysuru : कर्नाटकातील म्हैसूरजवळ झालेल्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. जीव गमावलेल्यांमध्ये 2 मुलांचाही समावेश आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, म्हैसूरच्या पोलीस अधीक्षक सीमा लाटकर यांनी सांगितले की, तिरुमाकुडलू-नरसीपूरजवळ खासगी बस आणि कारची धडक झाली. कारमधील एक व्यक्ती बचावली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या […]

UPSC Exam (6)

UPSC Exam (6)

Mysuru : कर्नाटकातील म्हैसूरजवळ झालेल्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. जीव गमावलेल्यांमध्ये 2 मुलांचाही समावेश आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, म्हैसूरच्या पोलीस अधीक्षक सीमा लाटकर यांनी सांगितले की, तिरुमाकुडलू-नरसीपूरजवळ खासगी बस आणि कारची धडक झाली. कारमधील एक व्यक्ती बचावली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने ट्विट केले की, “म्हैसूर जिल्ह्यातील टी नरसीपुराजवळ झालेल्या दुर्दैवी अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही म्हैसूरजवळ झालेल्या अपघातावर शोक व्यक्त केला असून आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. पीएम मोदींनी ट्विट केले की, “कर्नाटकातील म्हैसूर येथे झालेल्या दुर्घटनेने खूप दु:ख झाले आहे. या अपघातामध्ये ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबांसोबत माझी साहानुभूती आहेत. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.”

Exit mobile version