Download App

बापरे! वडिलांची ४ दिव्यांग मुलींसह आत्महत्या; धक्कादायक घटनेने दिल्ली हादरली..

देशाची राजधानी दिल्लीतून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पित्याने आपल्या चार मुलींसह आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.

Delhi News : देशाची राजधानी दिल्लीतून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील रंगपुरी भागात एका पित्याने आपल्या चार मुलींसह आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. या चारही मुली दिव्यांग होत्या असे सांगितले जात आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेण्यात आले. मृत हिरालाल यांच्या पत्नीचा मागील वर्षी कॅन्सरने मृत्यू झाला होता. त्यामुळे चार लेकींचा सांभाळ करण्याची सगळी जबाबदारी हिरालाल यांच्यावर होती. दिल्लीतील रंगपुरी येथे हिरालाल यांचं कुटुंब भाड्याने राहत होते. हिरालाल मुळचे बिहारचे होते.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिरालाल कारपेंटरचे काम करत होते. त्यांच्या पत्नीचा मृत्यू गेल्या वर्षीच झाला होता. पत्नीच्या मृत्यूनंतर चार मुलींची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. या चारही मुली दिव्यांग होत्या. हिरालाल यांच्या चारही मुली दिव्यांग होत्या. त्यांना चालता फिरता येत नव्हते. यामुळे हिरालाल अतिशय तणावात होते. मागील वर्षी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांचा मानसिक त्रास जास्तच वाढला होता. या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी का अशी चर्चा परिसरात सुरू होती.

Malaika Arora Father Death: अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या; कलाविश्वात खळबळ

पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. यामध्ये 24 तारखेला एक व्यक्ती घरात जाताना दिसत आहे. यानंतर घराचा दरवाजा बंद झाला होता. चार मुलींपैकी एका मुलीला दिसत नव्हते. एका मुलीला चालता येत नव्हतं तर बाकीच्या दोन मुलींची माहिती पोलिसांकडून गोळा केला जात आहे.

शुक्रवारी सकाळी 10 वाजता या घटनेची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. पोलीस येथे आले त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. फायर सर्व्हिस पथकाच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. पाचही मृतदेह पडलेले दिसले. बाजूच्या डस्टबिनमध्ये ज्यूसचे पॅकेट आणि पाण्याची बाटली मिळून आली. दिल्ली पोलिसांनी दिल्ली एफएसए, सीबीआय एफएसएल आणि सफदरजंग हॉस्पिटलच्या डॉक्टरांना बोलावून तपासणी केली. प्राथमिक तपासात ही आत्महत्या वाटत असली तर पाच जणांनी एकाच वेळी असे पाऊल का उचलले. केव्हापासून प्लॅनिंग सुरू होतं, वडिलांनीच मुलींना विष दिलं आणि नंतर स्वतः आत्महत्या केली असेल का यांसह अन्य अँगलने तपास केला जात आहे.

मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या पोस्टमार्टमचे अहवाल आल्यानंतरच मृत्यू नेमके कशामुळे झाले याचे उत्तर मिळू शकेल असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, मृत हिरालालच्या पत्नीचा मागील वर्षात कॅन्सरच्या आजाराने मृत्यू झाला होता. त्यामुळे हिरालालचा तणाव वाढला होता. हिरालाल सकाळीच कामावर जात होता. त्याआधी मुलींच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करत होता. कामावरून घरी आल्यानंतर पुन्हा त्यांची व्यवस्था पाहत होता. घर चालवण्याबरोबर मुलींचीही जबाबदारी सांभाळावी लागत होती. यातून त्याचा मानसिक त्रास वाढत गेला. शेवटी त्याने मुलींसह आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

Delhi CM : दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांचा आज शपथविधी; जुन्या निष्ठावंतांनाचं मंत्री म्हणून संधी

follow us