Delhi CM : दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांचा आज शपथविधी; जुन्या निष्ठावंतांनाचं मंत्री म्हणून संधी

  • Written By: Published:
Delhi CM : दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांचा आज शपथविधी; जुन्या निष्ठावंतांनाचं मंत्री म्हणून संधी

Atishi Marlena will take oath as Delhi CM : दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना आज, शनिवार (दि 21 सप्टेंबर)रोजी शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत इतर पाच मंत्रीसुद्धा (Delhi CM ) शपथ घेणार असून, जुन्या निष्ठावंत मंत्र्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

चालतानाच कोसळले; मनोज जरांगेंची तब्येत खालावली; मंत्री शंभूराजे देसाईंची उपचार घेण्याची विनंती

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर ‘आप’च्या विधिमंडळ पक्षाने आतिशी सिंह मार्लेना यांची नेता म्हणून निवड केली. नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी त्यांना शनिवारी शपथ घेण्यासाठी पाचारण केलं. ७० सदस्यीय विधानसभेत ‘आप’चे ६२ आमदार निवडून आले. विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिलेले असताना मंत्रिमंडळात काही फार बदल होण्याची शक्यता नव्हती.

दिल्लीत मुख्यमंत्र्यांसह सात मंत्र्यांचे मंत्रिमंडळ राहू शकतं. परंतु, मुख्यमंत्र्यांसह केवळ ६ जणांना शपथ दिली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मंत्रिपदाचे एक पद रिक्त ठेवण्यात येणार आहे. या पदावर कुणाची नियुक्ती करावयाची याबद्दल काही दिवसांनी निर्णय घेण्यात येणार आहे. आतिशी यांच्यासोबत सौरभ भारद्वाज, गोपाल राय, इम्रान हुसैन, कैलास गहलोत या माजी मंत्र्यांना पुन्हा संधी दिली जाणार आहे.

श्रीलंकेत आज राष्ट्रपती निवडणूक; दीड कोटी मतदार अन् 39 उमेदवार, कुणाचं पारडं जड..

तसंच, यावेळी मुकेश अहलावत यांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. अहलावत सुलतानपूर माजरा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. यापूर्वी दलित समाजाचे राजकुमार आनंद यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेल्याने मंत्रिपद रिक्त होते. एक मंत्रिपद मात्र रिक्त ठेवण्यात आलं आहे. यावर अद्यापही एकही मंत्री शपथ घेणार नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube