दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा! आप कार्यकर्त्यांचं आंदोलन, आतिशी यांच्यासह 2 मंत्री ताब्यात

दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा! आप कार्यकर्त्यांचं आंदोलन, आतिशी यांच्यासह 2 मंत्री ताब्यात

Arvind Kejriwal Arrested : दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल (Arvind Kejriwal Arrested) ईडीने अटक केली. या कारवाईमुळे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते चांगलेच भडकले आहेत. राजधानी दिल्लीत आज या अटकेविरोधात आप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. या प्रकरणीत पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी मार्लेना, सौरभ भारद्वाज यांचा समावेश आहे.

Delhi liquor scam : के. कविता, केजरीवाल, सिसोदियांचा कट; 100 कोटीही दिले, ईडीचा दावा

सौरभ भारद्वाज यांना आयटीओ भागातून ताब्यात घेण्यात आले. यानंतर भारद्वाज यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. भारद्वाज म्हणाले, आम्ही सुप्रीम कोर्टासमोर विनंती करू की केजरीवाल यांना त्यांचे वकील आणि कुटुंबियांना भेटू द्यावे. त्यांना त्यांचे कामकाज करण्याचीही परवानगी देण्यात यावी. याआधी अटकेविरोधात निदर्शने करणाऱ्या मंत्री आतिशी मार्लेना यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या अटकेच्या विरोधात संतापलेले आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते, नेते आणि आमदार पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन करत होते. सौरभ भारद्वाज यांच्या आधी पोलिसांनी आतिशी मार्लेना यांना ताब्यात घेतले. पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना गाडीत बसवण्यात आले.

आतिशी यांनीही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. हे लोक आधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना खोट्या प्रकरणात अटक करतात. नंतर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनाही अटक करतात. ही लोकशाही हत्या नाहीतर दुसरं काय आहे, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, केजरीवाल यांच्या अटकेनंतर विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार टीका चालवली आहे. शरद पवार, ममता बॅनर्जी, राहुल गांधी, संजय राऊत या नेत्यांनी या कारवाईवर जोरदार टीका केली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ; घरी पोहोचली क्राइम ब्रँचची टीम

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज