अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ; घरी पोहोचली क्राइम ब्रँचची टीम

अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ; घरी पोहोचली क्राइम ब्रँचची टीम

Arvind Kejriwal : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा संक्रिय झाल्या आहेत. नुकतीच झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना कथित भ्रष्ट्राचार प्रकणात ईडीने अटक केली आहे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) अडचणीत आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आहे.

अलीकडेच अरविंद केजरीवाल यांनी आपल्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता. यात सात आमदारांशी संपर्क साधण्यात आला होता. तसेच 21 आमदार फोडण्याची योजना आखण्यात आली होती, असा आरोप केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सीएम केजरीवाल यांना क्राइम ब्रँचची टीम नोटीस देण्यासाठी आली आहे.

दिल्ली क्राइम ब्रँचच्या टीमनुसार, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाने दखल घेतली नाही. एसीपी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून परत गेले आहेत. रिपोर्ट्सनुसार, सीएम केजरीवाल यांच्या आधी क्राइम ब्रँचची टीम मंत्री आतिशी यांच्या घरीही गेली होती. तेथेही दखल घेण्यात आली नाही. दिल्ली पोलिसांचे पथकही तेथून रवाना झाले आहे.

लोकांना पूनम पांडे हिचा मृत्यू म्हणजे अफवा आहे असं का वाटतंय? अखेर समोर आलं मोठं कारण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता. सात आमदारांशी संपर्क साधण्यात आला. त्यांचे 21 आमदार फोडण्याची योजना असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.

Lok Sabha 2024 : ‘हिंमत असेल तर वाराणसीतून भाजपाचा पराभव करा’; ममता बॅनर्जींचे काँग्रेसला चॅलेंज

दुसरीकडे मंत्री आतिशी यांनी आम आदमी पक्षाच्या आमदारांना भाजप 25-25 कोटी रुपयांची ऑफर देत असल्याचा आरोप केला होता. सात आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला होता. योग्य वेळ आल्यावर आम्ही ऑडिओ क्लिप जारी करू, असे सांगितले होते.

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या जीवाला धोका? राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज