Download App

मोठी बातमी! डॉक्टरांचा संप मागे, फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशचा निर्णय..

आज (22 ऑगस्ट) रोजी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (FAIMA) ने पुकारलेला 11 दिवसांचा संप संपवण्याचा निर्णय घेतला.

  • Written By: Last Updated:

Federation of All India Medical Association Calls off Strike : कोलकाता येथील आर. जी कर मेडिकल कॉलेज (R. G Kar Medical College) आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ शासकीय रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्टरांनी संप पुकारला होता. दरम्यान, आज (22 ऑगस्ट) रोजी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (FAIMA) ने पुकारलेला 11 दिवसांचा संप संपवण्याचा निर्णय घेतला.

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण संपणार; लक्ष्मण हाकेंचं मोठं विधान 

कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ज्युनियर डॉक्टरवर हल्ला आणि खून झाल्यामुळे देशभरात निषेध झाला. 12 ऑगस्ट रोजी, RDAs ने देशव्यापी निषेध सुरू केला, बाह्यरुग्ण विभाग (OPD) सेवा थांबवल्या होत्या. केवळ आपत्कालीन सेवा नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आज आंदोलक डॉक्टरांना कामावर परत येण्यास सांगितले होते. डॉक्टर कामावर रुजू झाल्यानंतर त्यांच्यावर कोणतीही प्रतिकूल कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन न्यायालयाने दिले होते. त्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला.

मोठी बातमी! डॉक्टरांचा संप मागे, फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशचा निर्णय.. 

फेमाने ट्वीट करत लिहिल की, FAIMA ने भारताच्या सरन्यायाधीशांच्या सकारात्मक निर्देशांनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या हितासाठी आणि सार्वजनिक सेवेच्या भावनेनं हा संप मागे घेतला. हा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या आवाहानला प्रतिसाद म्हणून घेण्यात आला. देशभरातील डॉक्टरांच्या संरक्षणासाठी आणि रुग्णालयांमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याबाबत आमच्या मागण्या मान्य केल्याबद्दल आभारी आहोत, असं या ट्वीटमध्ये म्हटलं.

एम्स दिल्ली, आरएमएल हॉस्पिटल, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज आणि दिल्ली सरकार संचालित इंदिरा गांधी हॉस्पिटलच्या आरडीएनेही संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.

काय म्हणाले होते सरन्यायाधीश?

कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी निवासी डॉक्टरांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. चंद्रचूड म्हणाले की, डॉक्टरांसह आरोग्य सेवेशी संबंधितांना आपल्या कामावर परत यावे. ते पुन्हा ड्युटीवर आल्यावर त्यांच्याविरुध्द कारवाई न करण्याबाबत सांगेल. तसेच डॉक्टर कामावर परतले नाहीत तर सार्वजनिक आरोग्याच्या पायाभूत सुविधा कशा चालतील? असा सवाल त्यांनी केला.

follow us

संबंधित बातम्या