Download App

PM मोदींचे OSD झाले देशाच्या अर्थमंत्र्यांचे जावई; चर्चा मात्र सीतारामन कुटुंबीयांच्या साधेपणाची!

राजकारणी म्हंटलं आणि त्याच्या घरातील एखादं कार्य म्हटले की, तो किती मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या शाही लग्नांची चर्चादेखील झाली आहे. मात्र, नुकत्याच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या घरात कार्य पार पडले आणि तेदेखील अत्यंत साधेपणाने. सध्या याच गोष्टीची देशभरात चर्चा केली जात आहे. गुरूवारी (दि. 8) रोजी सीतारामन यांची लेक परकला वांगमयी हिचा विवाह साधेपणाने केला. बंगळुरू येथील त्यांच्या घरी लग्नाचे विधी पार पडले. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याला केवळ कुटुंबातील सदस्य आणि खास मित्रमंडळीच उपस्थित होती. (Finance Minister Nirmala Sitharaman’s daughter Parakala Vangamayi tied the knot with Prateek on June 7 in a private ceremony in Karnataka’s Bengaluru)

नेते, व्हिआयपींना आमंत्रण नाही

या लग्न सोहळ्याची खासबाब म्हणजे या सोहळ्याला एकही नेता किंवा व्हिआयपींना आमंत्रण देण्यात आलेले नव्हते. याशिवाय आणखी एक विशिष्ट बाब म्हणजे सीतारामन यांचे जावई प्रतीक दोशी हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास सहकरी असून, ते पंतप्रधान कार्यालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. असे असतानाही या सोहळ्याला एकाही नेत्याला किंवा व्हिआयपी व्यक्तींना आमंत्रण देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे अत्यंत साधेपणाने पार पडलेल्या या विवाह सोहळ्याची सर्वच स्तरातून चर्चा केली जात आहे.

दोन्ही काँग्रेसच्या पराभवाचा बावनकुळेंचा भन्नाट फॉर्म्युला; म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना..

कोण आहेत सीतारामन यांचे जावई

सीतारामन यांचे जावई प्रतीक दोशी हे गुजरातचे रहिवासी असून, ते पीएमओ कार्यालायामध्ये ओएसडी म्हणून कार्यरत आहेत. सीतारामन यांची मुलगी परकला आणि प्रतीक यांचा विवाह ब्राह्मण पद्धतीने पार पडला. यावेळी नवदाम्पत्याला उडुपी अदमारू मठाच्या संतांनी आशीर्वाद दिले. सीतारामन यांनी यावेळी मोलाकलमुरू साडी नेसली होती. प्रतीक हे 2014 पासून पीएमओमध्ये कार्यरत असून, 2019 मध्ये त्यांना सहसचिव पद देण्यात आले. प्रतीक हे सिंगापूर मॅनेजमेंट स्कूलचा पदवीधर असून, मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना प्रतीक त्यांच्या कार्यालयात संशोधन सहाय्यक म्हणून कार्यरत होते.

Mira Road Murder : सरस्वती, शिक्षण घेऊन मुंबईला गेली ती परतलीच नाही, अहमदनगर कनेक्शन उघडकीस

फिचर रायटर आहे सीतारामन यांची कन्या

सीतारामन यांची कन्या परकला वांगमयी मिंट लाउंजमध्ये फीचर रायटर आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी मेडिल स्कूल ऑफ जर्नलिझम, नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी, यूएसए येथेही शिक्षण घेतले. तर, निर्मला यांचे पती परकला प्रभाकर हे राजकीय अर्थतज्ज्ञ असून, ते जुलै 2014 ते जून 2018 पर्यंत आंध्र प्रदेश सरकारचे कम्युनिकेशन सल्लागार होते.

Tags

follow us