दोन्ही काँग्रेसच्या पराभवाचा बावनकुळेंचा भन्नाट फॉर्म्युला; म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना..

दोन्ही काँग्रेसच्या पराभवाचा बावनकुळेंचा भन्नाट फॉर्म्युला; म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना..

Chandrashekhar Bawankule : राज्यात निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात होताच भाजप अॅक्शन मोडमध्ये आला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतेमंडळींनी राज्यात दौरे सुरू केले आहेत. भादप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अक्कलकोट तालुक्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.

ते म्हणाले, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता कायम राहण्यासाठी पक्ष, कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात, प्रभागात तीन बचत गट, 25 तरूण, शासकीय योजनांचे लाभार्थी आणि काँग्रेस व राष्ट्रवादीचे किमान 25 कार्यकर्ते भाजपमध्ये आणावेत. या माध्यमातून आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही काँग्रेसच्या अनामत रकमा जप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. येथील आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या दहिटणे गावात आयोजित टिफिन बैठकीत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपचे 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख जाहीर; या यादीतच दडलेत उमेदवार

दरम्यान, भाजपने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक प्रमुख जाहीर केले आहेत. लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 मतदारसंघात निवडणूक प्रमुख नियुक्त केले आहेत. त्यांच्यावर पक्षाने निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे. अशा प्रकारे पक्षाने निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

राज्यात भाजप आणि शिंदे गट सत्तेत येऊन एक वर्ष होईल. त्यात आता लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसेच भाजप आणि शिंदे गटात जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. जागावाटपावर अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. तरी देखील नेते मंडळी आपापल्या परीने जागांवर दावा ठोकत आहेत. पक्षांकडून मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे, येथे कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो याचा आढावा घेतला जात आहे.

सत्तासंघर्षावर SCचा निकाल काय? संजय राऊतांनी एका वाक्यात सांगितला…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube