Tamil Nadu News : तामिळनाडूतून एक मोठी बातमी समोर आली आहे. तिरुवल्लूवर (Tamil Nadu News) जिल्ह्यात ही घटना घडली. येथे डिझेलने भरलेल्या एका मालगाडीच्या चार डब्यांना अचानक आग लागली. ही रेल्वे मनाली (Indian Railways) येथून तिरुपतीला निघालेली होती. परंतु, रस्त्यात तिरुवल्लूवर येथे ही दुर्घटना घडली. या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) वेगाने व्हायरल (Train Accident Viral Video) होत आहे.
#WATCH | Tamil Nadu: Freight train carrying diesel catches fire near Tiruvallur. Efforts to douse the fire underway. pic.twitter.com/YSrKsHKy1i
— ANI (@ANI) July 13, 2025
आग लागल्यानंतर चार डब्यांतून काळ्या धुराचे लोळ उठले. नंतर आग वेगाने पसरू लागली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ फायर ब्रिगेड आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. अग्निशमन विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बऱ्याच मेहनतीनंतर या आगीवर नियंत्रण मिळवता आले. या भागात एखादा मोठा स्फोट झाला असावा असे दिसत होते.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानाने बाकीचे डबे रेल्वेपासून वेगळे करण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. जर ही आग सगळ्याच डब्यापर्यंत पोहोचली असती तर खूप मोठे नुकसान झाले असते. कारण या डब्यांमध्ये डिझेल भरलेले होते. या घटनेनंतर रेल्वे सतर्कता दाखवत चेन्नईच्या मार्गावरील रेल्वे थांबवल्या किंवा त्यांच्या मार्गात बदल केला. यामुळे प्रवाशांना काही काळ त्रास सहन करावा लागला. आता येथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे आणि रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
“तामिळनाडूला स्वायत्त बनवा” CM स्टॅलिन यांचा मोठा डाव; विधानसभेत प्रस्ताव सादर
या घटनेची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक माहितीनुसार तांत्रिक खराबी किंवा उष्णतेमुळे डब्यांना आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. परंतु, खरी माहिती तपासातूनच बाहेर येणार आहे. सुदैवाने या घटनेती कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी हजर असलेल्या अधिकाऱ्यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.