Tamil Nadu : तामिळनाडूत ‘अमूल’वरुन वाद, मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे अमित शाहांना पत्र

Tamil Nadu : तामिळनाडूत ‘अमूल’वरुन वाद, मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे अमित शाहांना पत्र

Tamil Nadu: कर्नाटकानंतर आता तामिळनाडूमध्येही अमूल दूधावरुन वाद सुरु झाला आहे. कर्नाटक निवडणुकीत अमूल दूधावरुन वाद पेटला होता. तेथील स्थानिक ब्रॅंड नंदिनी दूध विरुद्ध अमूल दूध असा संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता तामिळनाडूमध्ये दूधावरुन वाद सुरु झाला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहा यांना पत्र लिहुन अमूलकडून दूध खरेदी तत्काळ थांबवण्याचे आवाहन केलं आहे.

The Kerala Story : विरोधानंतरही केरळ स्टोरीची ‘अदा’ पुण्यात आली अन् म्हणाली…

या दूध खरेदीमुळे तामिळनाडूतील उद्भवणाऱ्या समस्यांकडे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केंद्र सरकाचं लक्ष वेधलं आहे. अमूल तामिळनाडूमधील कृष्णागिरी, धर्मापुरी, वेल्लोर, राणीपेट, तिरुपत्तूर, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यात आणि आसपास FPO आणि SHGs मार्फत दूध खरेदी करीत आहे.

CM Eknatha Shinde : शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका, आगोदर ‘हे’ काम करा

ही दूध खरेदी ‘ऑपरेशन व्हाईट फ्लड’ च्या विरोधात असून अशा खरेदीमुळे देशातील सध्याची दुधाची टंचाई पाहता ग्राहकांच्या समस्या वाढवतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

UPSC Result : यूपीएससीत नगरचे सात हिरे चमकले, राज्यातील 70 हून अधिक विद्यार्थी यशस्वी

अमूलच्या या निर्णयामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या खरेदी आणि विपणनामध्ये असलेल्या सहकारी संस्थांमध्ये स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे ही दूध खरेदी केंद्र सरकारकडून थांबवण्यात यावी, अशी विनवणी त्यांनी अमित शाहांकडे केली आहे.

दरम्यान, अमूलला तामिळनाडूमधून दूध खरेदी करणे तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यासाठी विनंती करत असल्याचं मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube