UPSC Result : यूपीएससीत नगरचे सात हिरे चमकले, राज्यातील 70 हून अधिक विद्यार्थी यशस्वी

UPSC Result : यूपीएससीत नगरचे सात हिरे चमकले, राज्यातील 70 हून अधिक विद्यार्थी यशस्वी

UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 12 टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून कश्मिरा संख्ये प्रथम तर देशात तिने 25 वा क्रमांक पटकाविला आहे. या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील सात विद्यार्थांनी यश संपादन केले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा (UPSC exam result 2022) निकाल जाहीर झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सात विद्यार्थांनी यश मिळवले आहे. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावची राजश्री देशमुख (719), मांची गावचा सुपुत्र स्वप्नील डोंगरे (707), सुकेवाडीचा मंगेश खिलारी (396), नगरचे जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांचे चिरंजीव महारुद्र भोर (750), सागर खर्डे (445), कर्जत तालुक्यातील चापडगावची श्रुती कोकाटे (608), पारनेर शहरातील अर्पिता ठुबे हिचे IPS चे प्रशिक्षण चालू असताना आयपीएसपदी निवड झाली आहे.

कर्जत तालुक्यातील चापडगाव हे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील अनेक भूमिपूत्र शासकीय सेवेत विविध पदावर काम करीत आहेत. चापडगावचे पहिले पोलीस अधिकारी सुभाष कोकाटे यांची कन्या श्रुती हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत 608 क्रमांकाने उत्तीर्ण होत आपल्या गावासह तालुक्याचे नाव देशपातळीवर नेले आहे.

UPSC 2022 Result : यूपीएससीमध्ये सारथीचा ‘डंका’, तब्बल सतरा जणांनी मारली बाजी

अहमदनगरच्या मंगेश खिल्लारीने यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं आहे. मंगेश खिल्लारी याने यूपीएससी परीक्षेत 396 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत बाजी मारली आहे. मंगेश खिल्लारी याने आत्तापर्यंत दोन वेळी परिक्षा दिली, मात्र, तिसऱ्यांदा मंगेश खिल्लारीने 396 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मंगेशचं प्राथमिक शिक्षण अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातल्या सुकेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर पुढील शिक्षण मंगेश पुण्यातल्या एसपी कॉलेजातून घेतलं. त्याचवेळी मंगेशने यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरु केला होता. त्यावेळी अर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मोठं अर्थिक चॅलेंज होतं पण आईवडिलांच्या सहकार्यानेच मला यश मिळाल्याचं मंगेशने सांगितलं आहे.

यूपीएससीत ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे राज्यात पहिली, पाहा निकाल

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत महारुद्र जगन्नाथ भोर हा उत्तीर्ण झाला आहे. नगरचे जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांचे ते चिरंजीव आहेत. नगर येथील रहिवाशी असून मूळ गाव अकोळनेर आहे. त्यांनी सिंहगड कॉलेज पुणे येथून बी.ई. मेकॅनिकलची पदवी घेतली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube