FM Nirmala Sitharaman Present Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 45 लाख कोटी रूपयांचा अर्थसंकल्प (Budget 2025) जाहीर केलाय. मोदी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी (FM Nirmala Sitharaman) विकसित भारतचा नारा लगावला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, देशाला समृद्धीकडे नेणारा अर्थसंकल्प आहे. जगात आपलीच अर्थव्यवस्था सर्वात वेगवान असून देशाला प्रगतीकडे नेणं हेचं आमचं लक्ष आहे. तर सबका विकास हेच आमचं उद्धिष्ट आहे. गेल्या 10 वर्षांचा आपला विकासाचा ट्रॅक रेकॉर्ड आणि संरचनात्मक सुधारणांनी जागतिक लक्ष वेधलंय. या काळात भारताच्या क्षमता आणि क्षमतेवरील विश्वास वाढला आहे.
मोदी सरकारचा ३.० चा आज पहिला पूर्ण अर्थसंकल्प; अर्थमंत्री निर्मला सीतारमण करणार नवा विक्रम
पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केलीय. राज्याच्या मदतीने ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेचा 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल. 100 जिल्ह्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार. राज्याच्या मदतीने ही योजना देशभरात राबवली जाणार. आसाममधील नामरूप येथील युरिया प्लांट उभारण्यात येणार आहे. आसाममधील नामरूप येथे 12.7 लाख मेट्रिक टन वार्षिक क्षमतेचा एक प्रकल्प उभारला जाईल. पूर्वेकडील भागातील तीन बंद युरिया प्लांट पुन्हा सुरू करण्यात आले आहेत, युरिया उत्पादनात स्वयंपूर्णतेकडे एक पाऊल टाकलं जातंय.
100 जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना. शेतकऱ्यांना योग्य दर देणार. तूर उडीद मसूर कडधान्याचं 6 वर्षांचं मिशन, कॉटन प्रोडक्शनसाठी 5 वर्षांची मोहिम सुरू केली जाणार आहे. पूर्व भारतात यूरिया प्लांट सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. किसान क्रेडीट कार्डवर कर्ज मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलीय.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी उत्पादकता सुधारण्यासाठी अनेक नवीन पावले उचलली जातील. धनधान्य कृषी योजना, तेलबिया, कडधान्ये, फळे आणि भाजीपाला उत्पादनावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. माखणा शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहे. कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी पाच वर्षांचे मिशन सुरू केले जाईल. किसान क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्यात आली आहे. युरिया उत्पादनात स्वावलंबनावर भर देण्यात आला आहे.
अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तेजी; निफ्टी 23,530च्या वर, मिडकॅप शेअर्समध्ये मोठी खरेदी
2025 च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित विकास उपाययोजनांमध्ये गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या दहा व्यापक क्षेत्रांचा समावेश आहे. कृषी विकास आणि उत्पादकता वाढवणे, ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता निर्माण करणे, समावेशक विकास मार्गावर सर्वांना एकत्र आणणे, एमएसएमईंना पाठिंबा देणे, कृषी विकास आणि उत्पादकता वाढवणे, रोजगार-नेतृत्वाखालील विकास सक्षम करणे, अर्थव्यवस्था आणि नवोपक्रमात गुंतवणूक करणे, ऊर्जा पुरवठा सुरक्षित करणेनिर्यातीला प्रोत्साहन देणे, नवोपक्रमाचे पालनपोषण करणे याचा समावेश आहे.