Elon Musk : केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानंतर आता एलोन मस्कच्या मालकीच्या एक्सने आपल्या युजर्सविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. एक्सने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन तब्बत 600 अकाउंट डिलीट केली आहे तर 3500 पेक्षा जास्त पोस्ट हटवल्या असल्याची माहिती एक्सकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारने एक्स वरील अश्लील कंटेंटवर आक्षेप घेतल्यानंतर एक्सकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
तसेच यापुढे आमच्या प्लॅटफॉर्मवर (X) अश्लील कंटेंट प्रकाशित करु देणार नाही आणि सरकारी नियमांचे पालन करण्यात येणार असे आश्वसन केंद्र सरकारला (Central Government) एक्सकडून देण्यात आले आहे.
केंद्र सरकारचा इशारा
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एक्स विरुद्ध इशारा दिल्यानंतर एका आठवड्याने ही कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रालयाने ग्रोकवर (Grok) AI चा “घोर गैरवापर” केल्याचा आणि महिलांची अश्लील बदनामी करण्यासाठी “आक्षेपार्ह किंवा अश्लील” प्रतिमा किंवा व्हिडिओ तयार आणि शेअर केल्याचा आरोप केला आहे. मंत्रालयाने एक्स ला इशारा दिला की 72 तासांच्या मुदतीचे पालन न केल्यास कंपनीला कायदेशीर परिणाम भोगावे लागतील.
ग्रोकवर अश्लील फोटो तयार केल्याचा आरोप
एलोन मस्कच्या (Elon Musk) एक्स प्लॅटफॉर्मवरील एआय चॅटबॉट ग्रोकवर महिला आणि मुलांच्या अश्लील फोटो तयार केल्याचा आरोप आहे. जगभरातील सरकारांनी चिंता व्यक्त केली आहे आणि ग्रोकवर टीका केली आहे. या यादीत भारत, फ्रान्स, ब्राझील, मलेशिया आणि युरोपियन युनियनचा समावेश आहे.
सकाळी 7 ते रात्री 12 – प्रत्येक शो हाऊसफुल! ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ची घोडदौड
एआय फॉरेन्सिक्स या ना-नफा गटाने म्हटले आहे की त्यांनी 25 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान ग्रोकने तयार केलेल्या 20,000 फोटोंचे विश्लेषण केले आणि असे आढळून आले की दोन टक्के व्यक्ती 18 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना बिकिनीमध्ये दर्शवितात.
