Download App

भारीच! जगात भारतीय आइस्क्रीमचा डंका; टॉप 100 यादीत 5 Indian Ice Creams

TasteAtlas नुसार भारतातील पाच प्रसिद्ध आइस्क्रीम पार्लर्सने जगातील टॉप 100 आइस्क्रिम पार्लर्समध्ये स्थान मिळवलं आहे.

Indian Ice Creams : देशभरात मान्सूनचा पाऊस बरसत आहे. पावसाच्या सरी (Indian Ice Creams) बरसत असताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. यंदा फक्त पावसानेच लक्ष वेधलेलं नाही तर भारतीय आइसक्रीमचीही जोरदार चर्चा सुरू आहे. जगभरात भारतीय आइस्क्रीम मोठ्या आवडीनं खाल्लं जात आहे. TasteAtlas नुसार भारतातील पाच प्रसिद्ध आइस्क्रीम पार्लर्सने जगातील टॉप 100 आइस्क्रिम पार्लर्समध्ये स्थान मिळवलं आहे. या यादीत कोणती भारतीय आइस्क्रीम आहेत याची माहिती घेऊ या..

रुस्तम अँड कंपनी : मुंबईचं आइस्क्रीम सँडविच

रुस्तम अँड कंपनी नामक आइस्क्रीम पार्लर सन 1953 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. मुंबईत या (Mumbai News) आइस्क्रीम पार्लरची लोकप्रियता खूप जास्त आहे. आइस्क्रीम सँडविच हे खास आकर्षण आहे. ही डिश क्रिस्पी वेफर बिस्कीटमध्ये आइस्क्रीमची एक मोठी स्लाइस ठेऊन तयार केली जाते. मँगो आइस्क्रीम सँडविचला जास्त मागणी असते.

कॉर्नर हाऊस-बंगळुरूचं डेथ बाय चॉकलेट

कॉर्नर हाऊस 1982 पासून लोकांच्या पसंतीचं ठिकाण राहिलं आहे. विशेष करून डेथ बाय चॉकलेट सनडे आइस्क्रीम खूप प्रसिद्ध आहे. या टेस्टी आइस्क्रिममध्ये चॉकलेट केक, आइस्क्रिम, रिच चॉकलेट सॉस, क्रिस्पी नट्स आणि वरतून चेरी टाकली जाते. त्यामुळे या आइस्क्रिनचा स्वाद आणखी वाढतो.

धक्कादायक! आईसक्रीममध्ये आढळलं मानवी बोट; मालाडमधील घटना, कंपनीवर गुन्हा दाखल

नॅचरल आइस्क्रीम – टेंडर कोकोनट डिलाइट

नॅचरल आइस्क्रीमची सुरुवात 1984 मध्ये करण्यात आली होती. कोणत्याही केमिकलचा वापर न करता हे आइस्क्रीम तयार केले जाते. यामध्ये भरपून फ्लेवर्स आहेत. परंतु, यातील टेंडर कोकोनट सर्वात खास आहे. हे आइस्क्रीन नारळापासून तयार केले जाते.

अप्सरा आइस्क्रीम – स्पाइसी स्वीट गुआवा

मुंबईचं अप्सरा आइस्क्रीम नवीन आणि फ्रेश फ्लेवर्समुळे लोकांच्या पसंतीस उतरलं आहे. पेरुपासून तयार होणारे आइस्क्रीमही खूप खास आहे. यात पेरूचे तुकडे आणि हलक्या मसाल्यांचा वापर केला जातो. या आइस्क्रिमला मिरची पावडरसह सर्व केले जाते.

पब्बाज – गडबड आइस्क्रीम

सन 1975 पासूनच मंगळुरूचे पब्बा गडबड आइस्क्रीम अनेकांचं फेव्हरेट आइस्क्रीम आहे. रंगबेरंगी आइस्क्रीम जेली, ताजी फळे, क्रिस्पी नट्सबरोबर अनेक फ्लेवर्सच्या लेयर्समध्ये तयार केले जाते. या आइस्क्रीमचा स्वाद अनेकांना भावतो.

बापरे बाप आइस्क्रीममध्ये साप! लोकांंच्या जीवाशीच खेळ; फोटो तुफान व्हायरल

‘झणझणीत मिसळ’ ‘छोले भटुरे’ अन् ‘स्वादिष्ट पराठा’ बेस्ट ब्रेकफास्ट यादीत 3 भारतीय डिश

follow us