धक्कादायक! आईसक्रीममध्ये आढळलं मानवी बोट; मालाडमधील घटना, कंपनीवर गुन्हा दाखल

धक्कादायक! आईसक्रीममध्ये आढळलं मानवी बोट; मालाडमधील घटना, कंपनीवर गुन्हा दाखल

Human Finger in Ice Cream in Malad case filed on Company : मुंबईतील मालाडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन मागवण्यात आलेल्या एका कंपनीच्या आईस्क्रीममध्ये ( Ice Cream ) चक्क मानवी बोट ( Human Finger ) आढळून आलं आहे. या घटनेनंतर संबंधित कंपनीवर गुन्हा (case filed on Company) देखील दाखल करण्यात आला आहे.यम्मो असं या आईस्क्रीम कंपनीचं नाव आहे.

Maharaj Controversy : जुनैदच्या ‘महाराज’ चित्रपटाला वादाचे ग्रहण, कोर्टात याचिका दाखल

नेमकी घटना काय?

ज्या तरुणांसोबत ही घटना घडली. त्याने याबाबत माहिती देताना सांगितलं की, माझं नाव ब्रेंडन सेराओ आहे. मी एक डॉक्टर आहे. सध्या माझी परिक्षा सुरू आहे. त्याच दरम्यान मी एका अँपवरून ऑनलाईन तीन आईस्क्रीम मागवल्या होत्या. हे तीन आईस्क्रीमचे कोन होते. त्यातील एक आईस्क्रीम मी खायला घेतलं असताना अचानक त्यामध्ये मला मोठा तुकडा आढळला.

नीट बघितल्यानंतर कळालं की हा तुकडा म्हणजे एखाद्या व्यक्तीचं तुटलेलं बोट आहे. त्यानंतर या तरुणाने हे मानवी बोट बर्फामध्ये ठेवून टिकवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करताना हे मानवी बोट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. दरम्यान पोलिसांना या घटनेबद्दल तक्रार मिळाल्यानंतर संबंधित आईसक्रीम कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव कसं फिक्स झालं?; भुजबळांनी आतली बातमी फोडली

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज