शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक; थोडक्यात बचावलेल्या अभिनेत्रीने कंपनीला सुनावले खडेबोल

Shilpa Shirodkar’s car hit by a bus; The actress, who narrowly escaped, Alligation on the company : गेल्या काही वर्षांपुर्वी बिग बॉस 18 मध्ये दिसलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या कारला बसने धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. याबाबत स्वत: शिल्पाने तिच्या सोशल मिडीयावर पोस्ट करत माहिती दिली आहे. या अपगातामध्ये तिच्या कारचा आरसा तुटला आहे.तसेच कारच्या मागच्या भागाचे नुकसान झाले आहे. तर सुदैवाने या अपघातामध्ये कुणीही जखमी झालं नाही.
भव्यदिव्य सेटवर चित्रीत होणार रहस्यमय ‘घबाडकुंड’; दिसणार चमत्कारीक गोष्टी
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने याबाबत तिच्या इंन्स्टाग्रामवर पोस्ट केली. तसेच टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने देखील ही बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये तिने तिच्या अपघातग्रस्त कारचा फोटो टाकला. तर कॅप्शनमध्ये तिने म्हटले आहे की, आज सिटीफ्लोच्या एका बसने माझ्या कारला धडक दिली. मात्र या बसच्या कंपनीच्या मुंबई ऑफिसचे प्रतिनिधी योगेश कदम आणि विलास मनकोटे हे म्हणत आहेत की, ही त्यांची कंपना नाही. तसेच ते ड्रायव्हरची जबाबदारी आहे. असं म्हणत अंग काढून घेत आहेत.
https://www.instagram.com/shilpashirodkar73/?igsh=MTByY296MDh3ZXQwbw%3D%3D#
आयारामांमुळे संघ परिवार प्रदूषित…; स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी टोचले भाजपचे कान
तसेच ती पुढे म्हणाली की, मी तक्रार केल्यानंतर कोणत्याही अडचणीशिवाय माझी मदत केली त्यासाठी मुंबई पोलिसांचे आभार. मात्र ही बस कंपनी या अपघाताची जबाबदारी घेत नाही आहे. पण त्यांचे ही आभार. तसेच सुदैवाने माझ्या स्टापला काही झालं नाही. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. पण काहीही होऊ शकत होतं.
मास्टर ब्लास्टरच्या घरी लगीनघाई! कोण आहे अर्जुनची होणारी पत्नी? पाहा खास फोटो
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या करिअर बद्दल सांगायचं झालं तर तिने 1989 साली मिथुन चक्रवर्तीचा चित्रपट भ्रष्टाचारमधून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. तसेच तिने तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमध्ये देखील काम केलं. तसेच टीव्हीवर देखील तिने काम केलं. तर नुकतचं काही वर्षांपुर्वी 51 वर्षांची अभिनेत्री शिल्पा शिरोडकर सलमान खानच्या बिग बॉस 18 मध्ये दिसली होती.