Video : राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव कसं फिक्स झालं?; भुजबळांनी आतली बातमी फोडली

Video : राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव कसं फिक्स झालं?; भुजबळांनी आतली बातमी फोडली

Chhagan Bhujbal on Rajya Sabha Election : बारामती लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांनाच उमेदवारी दिली आहे. पक्षात आणखी नेते इच्छुक असतानाही या नेत्यांची नाराजी ओढवून घेत सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सगळ्यात मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्याही चर्चा आहेत. खरंच या चर्चांमध्ये तथ्य आहे का, राज्यसभेसाठी अन्य नेते इच्छुक असताना सुनेत्रा पवारांनाच का तिकीट देण्यात आलं, या कळीच्या प्रश्नांची उत्तरं स्वतः छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) दिली आहेत. भुजबळांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला आहे. मी काही नाराज नाही, असे स्पष्ट केले.

“लोकसभेला साथ दिली, पुढे तीन महिन्यांनीही द्या”, शरद पवारांची विधानसभेसाठी फिल्डिंग

भुजबळ पुढे म्हणाले, राज्यसभेसाठी मी इच्छुक होतो. माझ्याबरोबर आनंद परांजपे सुद्धा इच्छुक होते. बाबा सिद्दीकीही होते. परंतु, बैठकीत चर्चा करून आम्ही सर्वानुमते सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत अजित पवारांनी याबाबत काहीच म्हटलेलं नाही. आम्ही पक्षाच्या कोअर कमिटीतले जे नेते आहोत त्यांनी हे ठरवलं आहे. त्यामुळे अजितदादांना बोलण्यात काय अर्थ आहे. हा त्यांचा निर्णय नाही आमच्या सगळ्यांचा हा निर्णय आहे.


पक्षाच्या कार्यप्रणालीवर तुम्ही नाराज आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता भुजबळ म्हणाले, माझ्या तोंडावरून तुम्हाला मी नाराज असल्याचं कुठं दिसतंय का? मी नाराज नाही. पक्षात सगळ्यांना बरोबर घेऊन निर्णय घ्यायचे असतात हे आम्ही आज नाही तर मागील 57 वर्षांपासून शिकत आहोत. तुम्हीच म्हणताय 13 लोक इच्छुक होते मग मला सांगा तेरा जणांना उमेदवारी देणं शक्य होतं का? कुणाला तरी एकालाच उमेदवारी देणार ना. आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला आहे, असे भुजबळ म्हणाले.

पराभूत उमेदवाराला पुन्हा राज्यसभेची उमेदवारी कशाला असाही एक सूर होता असे पत्रकारांनी विचारले. पक्षाने घेतलेला हा निर्णय आहे आणि पक्षाचा निर्णय सर्वांनाच मान्य करावा लागतो अशा शब्दांत भुजबळांनी उत्तर दिलं. यानंतर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही भाष्य केलं. त्यांच्याकडून एकेरी उल्लेख करत टीका केली जाते. परंतु, मला त्याचं काही वाटत नाही. कारण, राजकीय जीवनात मी अशा टीका अनेक वेळा सहन केल्या आहेत असे भुजबळ म्हणाले.

विकासासाठी मोदींची मदत घ्यायला मागे-पुढे बघणार नाही; पवारांचं बारामतीत मोठं विधान

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज