विधानसभेला शिंदें इतक्याच जागा आम्हाला हव्यात; भुजबळांनी जागा वाटपाचा सूर आवळला अन् भितीही सांगितली !

  • Written By: Published:
विधानसभेला शिंदें इतक्याच जागा आम्हाला हव्यात; भुजबळांनी जागा वाटपाचा सूर आवळला अन् भितीही सांगितली !

Chhagan Bhujbal On Assembly election seat sharing: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) रौप्यमहोत्सवी स्थापना दिनाचा कार्यक्रम आज मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका जाहीरपणे सांगितल्या. तसेच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 80 जागा मिळाल्या पाहिजेत. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जेवढ्या जागा दिल्या जातील, तेवढ्याच जागा आम्हालाही मिळाला पाहिजे, असे छगन भुजबळ यांनी कार्यक्रमात ठणकावून सांगितले आहे.

‘…त्याबद्दल शरद पवारांविषयी मी कृतज्ञ’; वर्धापन दिनाच्या भाषणात अजितदादा भावूक

विधानसभेच्या जागावाटपाबाबत भुजबळ म्हणाले, विधानसभा निवडणुकीला आपल्याला सगळ्याचं धर्मांची मते घ्यावी लागणार आहेत. आपल्या पक्षाला 80 जागा मिळाल्या पाहिजेत. शेवटपर्यंत जागा वाटपाचे गुऱ्हाळ चालवून फायदा होणार नाही. त्याचा लवकर निपटारा करून घ्यावा लागणार आहे. महायुतीमध्ये भाजप मोठा पक्ष आहे हे मान्य आहेत. ते बिग ब्रदर आहेत. पण आमचेही चाळीस आमदार आहे. शिंदेंचेही चाळीस आमदार आहेत. शिंदेंचे जास्त खासदार आले आहेत, म्हणून त्यांना जास्त जागा आणि आमचे कमी खासदार आले म्हणून कमी जागा, असे भांडणे वगैरे करू नका, असा टोलाही भुजबळांनी लावला आहे.

ही पण मते गेली आणि ती पण ; प्रचार सभांना न बोलविण्याचे शल्य भुजबळांनी जाहीरपणे बोलून दाखविले

मुंबईत कोट्यवधींचे विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे महायुतीचे मुंबईतील सर्व उमेदवार निवडून येतील, असे वाटत होते. परंतु पियूष गोयल आणि रवींद्र वायकर हे निवडून आले आहेत. वायकर हे केवळ 48 मतांनी निवडून आले आहेत. शेवटी दोन मोठे समाज आपल्याला सोडून गेले आहेत. मुस्लिम, दलित समजाबरोबर आदिवासी समाज हे आपल्याला सोडून गेले आहेत. आजार ओळखून औषध दिले तर यश आपले आहे. विकास करायला पाहिजे. मुस्लिमांबाबत हे करणार आहे, असे बोलून दुखावले आहे. संविधान बदलण्याचा प्रचार झाला आहे. चारशेपार म्हणाल्याने दोन मोठे समाज बाजूला गेले. आदिवासी समाज बाजूला गेला आहे. संविधान बदलणे म्हणजे आरक्षण जाणार हे डोक्यात गेले. तेच आदिवासींच्या डोक्यात गेले आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीत तो प्रश्न संपला आहे. विधानसभेला दलित, मुस्लिम, ओबीसी, मराठा मतदार परत मिळवावा लागणार आहे, असे भुजबळ म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज