विकासासाठी मोदींची मदत घ्यायला मागे-पुढे बघणार नाही; पवारांचं बारामतीत मोठं विधान

विकासासाठी मोदींची मदत घ्यायला मागे-पुढे बघणार नाही; पवारांचं बारामतीत मोठं विधान

Sharad Pawar Big statement about Help from PM Modi : राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार ( Sharad Pawar) यांनी एक मोठं विधान केलं आहे. पवार म्हणाले की, बारामतीच्या विकासासाठी पंतप्रधान मोदी ( PM Modi ) यांचीही मदत घ्यायला लागली तर मागेपुढे बघणार नाही. ते बारामतीमध्ये आयोजित व्यापारी मेळाव्यात बोलत होते.

उशिरा येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची आयुक्तांकडून हजेरी; गेटवर खुर्ची टाकत सुनावले खडेबोल

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकांवर लक्ष असायला हवं. आम्ही सत्तेत असताना काही धोरण आखली होती. त्याचा हा फायदा झाला आहे. तसेच पुढील काळात बारामतीत आणखी मोठे उद्योगांना यासाठी व्यापाऱ्यांचा सहकार्य गरजेचं असल्याचं शरद पवार म्हणाले.

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी घेतली अजित पवारांची भेट… राजकीय चर्चांना उधाण

तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले की, या उद्योगांसाठी राज्याने केंद्र सरकारशी बोलून मी प्लॅन करत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर जरी वैयक्तिक टीका केली असली. तरी विकासासाठी आगामी काळात मी मोदींची मदत घ्यायला देखील मागे-पुढे बघणार नाही. असं म्हणत पवार यांनी विकास कामांचा आश्वासन दिलं. तसेच त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

तसेच यावेळी पवार यांनी लोकसभेमध्ये भाजपाच्या जागा घटल्या त्यावरती देखील टीका केली. ते म्हणाले राम मंदिर हा प्रचाराचा मुद्दा असेल असं मला वाटायचं. त्यामुळे भाजपला मतदान होईल. असेही वाटत होतं. या मंदिराची आम्हाला भीती वाटत होती .मात्र जिथे मंदिर बांधलं तिथेच भाजपाचा पराभव झाला आहे. सरकारने जमिनीवर पाय ठेवून काम केले पाहिजे. हे या मतदानातून जनतेने दाखवून दिलं आहे. असंही शरद पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube