‘झणझणीत मिसळ’, ‘छोले भटुरे’ अन् ‘स्वादिष्ट पराठा’, बेस्ट ब्रेकफास्ट यादीत 3 भारतीय डिश

टेस्ट एटल्सने एक लिस्ट जारी केली आहे. याच जगातील टॉप 50 नाश्ता डिशेसचा समावेश आहे. तीन भारतीय डिशेसना स्थान मिळालं आहे.

Indian Food

Indian Food

Indian Food Dishes : भारतीय खाद्यपदार्थांची जगभरात वेगळीच (Indian Food Dishes) क्रेझ आहे. भारतीय मसाले जगात (Indian Spices) वेगळी ओळख घेत प्रसिद्ध झाले आहेत. या मसाल्यांनी जेवणाची चव अधिकच वाढते. याच मसाल्यांची जादू भारतीय खाद्यपदार्थांत दिसते. भारतात सकाळच्या नाश्त्यात विविध पदार्थ (Breakfast) तयार केले जातात. त्यांची चवही लय भारी अशीच असते. फक्त भारतातच नाही तर जगात या खाद्यपदार्थांची क्रेझ आहे. नुकतीच टेस्ट एटल्सने एक लिस्ट जारी केली आहे. यात जगातील टॉप 50 नाश्ता डिशेसचा समावेश आहे. या यादीत तीन भारतीय डिशेसना स्थान मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या खाद्यपदार्थांच्या डिश आहेत.

मिसळ पाव

महाराष्ट्रात आलात की तुम्हाला झणझणीत मिसळ पावचा सुगंध येईलच. मिसळ स्वादात तर नंबर एक आहेच शिवाय पोषणानेही भरपूर आहे. झणझणीत मिसळ सोबत नरम पाव, कांदा, मिरची अन् लिंबू अशी डिश पाहून कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. ठिकठिकाणच्या हॉटेलात किंवा गावातील एखाद्या छोट्याशा हॉटेलात गेलात तरी मिसळ पाव मिळतोच. मिसळ पाव खरंतर एक मराठी डिश आहे पण याच मिसळेचा ठसका जगभरात पोहोचलाय की. या यादीत मिसळ पावच्या डिशला 18 वा क्रमांक मिळाला.

पराठा

उत्तर भारतात पराठा मोठ्या आवडीने खाल्ला जातो. खरंतर पराठा हा उत्तर भारतीयांचा पारंपारिक खाद्य पदार्थ आहे. पराठा गव्हाच्या पीठापासून तयार केला जातो. नंतर याला तेल किंवा तुपात तळले जाते. आलू पराठा, गोभी पराठा, मुळ्याचा पराठा, पनीर पराठा असे काही पराठ्याचे प्रकार आहेत. पराठा तुम्ही दही किंवा चटणीसोबत खाऊ शकता. पराठा फक्त स्वादिष्टच नाही तर पौष्टिक आणि शरीराला एनर्जी देणाराही आहे. या यादीत पराठा डिशला 23 वा क्रमांक मिळाला आहे.

छोले भटुरे

छोले भटुरे विशेष करुन पंजाब, दिल्ली आणि अन्य उत्तर भारतीय राज्यांत प्रसिद्ध आहे. आजच्या काळात देश विदेशात प्रसिद्ध झाले आहेत. यात काबुली चना आणि भटुरा (मैद्याद्वारे तयार करुन तळलेला ब्रेड) असतो. हे कॉम्बिनेशन उत्तमच आहे. नाश्त्यात छोले भटुरे आवडीने खाल्ले जातात. कांदा, लोणचं आणि लस्सीसोबत तु्म्ही छोले भटुरेचा आनंद घेऊ शकता. आता ही डिश विदेशातील विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये फेमस झाली आहे. या यादीत छोले भटुरे डिशला 32 वा क्रमांक मिळाला आहे.

Exit mobile version