Download App

Forbe’s Rich List 2023 : मुकेश अंबानी पुन्हा आशियातील श्रीमंत व्यक्ती, अदानी कितव्या नंबरवर?

  • Written By: Last Updated:

Forbe’s Rich List 2023 : भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत आहेत. फोर्ब्सने 2023 या वर्षातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये मुकेश अंबानी पुन्हा एकदा नंबरवर राहिले आहेत. तर याच यादीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरणारे मुकेश अंबानी जगातील टॉप – २० च्या यादीत श्रीमंतांच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहेत.

मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ८३.४ अब्ज डॉलर आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार गेल्या वर्षी 2022 मध्ये अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज $100 बिलियन पेक्षा जास्त उत्पन्न मिळवणारी पहिली भारतीय कंपनी बनली होती. नवीन यादीनुसार मुकेश अंबानी मायक्रोसॉफ्टचे स्टीव्ह बाल्मर, गुगलचे लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन, फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग आणि डेल टेक्नॉलॉजीजचे मायकेल डेल यांच्यापेक्षा वरच्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी या यादीत अंबानी ९०.७ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह १० व्या क्रमांकावर होते.

अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षाला लाखो डॉलर्सचा दंड, पॉर्न स्टारला द्यावी लागणार नुकसान भरपाई

अदानी यांना धक्का

हिंडेनबर्गच्या रिसर्चच्या अहवालामुळे मोठे नुकसान झालेले गौतम अदानी या यादीत २४ व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. २४ जानेवारी रोजी अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गचा अहवाल प्रकाशित होण्यापूर्वी १२६ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.

या अहवालानुसार सध्या अदानीची एकूण मालमत्ता $47.2 अब्ज आहे आणि जगातील अब्जाधीशांच्या यादीत २४ व्या क्रमांकावर आहे. पण तरीही ते मुकेश अंबानी यांच्यानंतर भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

भारतात इंधनाच्या किंमती वाढणार? कारण…

देशातील या व्यक्तीचा समावेश

या वर्षीच्या नव्या यादीनुसार एचसीएलचे शिव नाडर हे $25.6 अब्ज संपत्तीसह भारतातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर त्यांच्यानंतर  व्हॅक्सिन किंग म्हणून ओळखले जाणारे सायरस पूनावाला चौथ्या क्रमांकावर, स्टील व्यावसायिक लक्ष्मी मित्तल पाचव्या क्रमांकावर, सहाव्या क्रमांकावर ओपी जिंदाल समूहाच्या सावित्री जिंदल, सातव्या क्रमांकावर सन फार्माचे दिलीप सांघवी आणि आठव्या क्रमांकावर डी-मार्टचे राधाकृष्ण दमाणी यांचा समावेश आहे. तर कुमार मंगलम बिर्ला नवव्या तर उदय कोटक दहाव्या क्रमांकावर आहेत.

Tags

follow us