भारतात इंधनाच्या किंमती वाढणार? कारण…
ओपेक देशांनी तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सौदी अरेबिया, ओपेक आणि ओपेकमध्ये नसणाऱ्या सदस्यांसाठी हा मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या वाढीमुळे सर्वासामान्य नागरिकांना त्याचा मोठा अर्थिक बसणार आहे.
राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ होणार; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बदलणार; जयंत पाटील यांची माहिती
ओपेक देश भारताच्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 60 टक्के पुरवठा करतात. त्यामुळे ओपेक देशांनी उत्पादन कमी केल्यास भारतात पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मीडियाच्या अहवालानूसार, सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयाने कुठल्याही देशाचं नाव न घेता सांगितलं. ही कपात काही ओपेक आणि गैर-ओपेक सदस्यांसह संयुक्तपणे केली जाणार आहे. आंतराराष्ट्रीय बाजारपेठ स्थिर राहण्यासाठी हा खबरदारीचा उपाय म्हणून पाऊले उचलण्यात येत आहेत.
Uddhav Thackeray फडणवीसांना फडतूस म्हणाले… अन् राज्यात धुरळा उडाला!
ओपेक देशांच्या या निर्णयामुळे तेलाच्या किमती प्रति बॅरल सुमारे 800 रुपयांनी वाढू शकणार असल्याचं गुंतवणूक फर्म पिकरिंग एनर्जी पार्टनर्स यांनी स्पष्ट केलंय. ओपेक देशांनी प्रतिदिन साडे अकरा लाख बॅरल कपात करण्याचा निर्णय घेतल्याने पेट्रोल पंपावरील तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मे २०२३ या वर्षापासून सौदी अरेबिया तेल उत्पादनात दररोज 5 लाख बॅरल कपात करणार आहे. याशिवाय इराक सहित UAE, कुवेत, अल्जेरिया आणि ओमान देखील तेल उत्पादनात कपात करणार आहे, असा अहवाल इंडियन एक्सप्रेसने दिला आहे.
लाचार, लाळघोटेपणा करणारा फडतूस गृहमंत्री; ठाकरेंनी डागली फडणवीसांवर तोफ
या निर्णयामुळे सौदी अरेबिया आणि अमेरिकाच्या संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ओपेक देशांमध्ये सौदी अरेबिया, इराक, इराण, व्हेनेझुएला आणि इतर अनेक देशांचा समावेश आहे.