लाचार, लाळघोटेपणा करणारा फडतूस गृहमंत्री; ठाकरेंनी डागली फडणवीसांवर तोफ
ठाणे : काल ठाकरे गट (Thackeray group) आणि शिंदे गट (shinde) यांच्यामध्ये ठाण्यात जोरदारा राडा झाला. ठाण्यात शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला करत मारहाण केली. यात रोशनी ह्या जबर जखमी झाल्यात. त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सपत्नीक रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी शिंदे गटाचा खरपूस समाचार घेत गृहमंत्र्यावरही तोफ डागली. राज्याला एक फडतुस गृहमंत्री लागला अशी शब्दात त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
ठाकरे म्हणाले, ठाण्याची ओळख शिवसेनेचं, बाळासाहेबांच आणि आनंद दिघेंचं सुशिक्षित, सुसंस्कृत ठाणं अशी ओळख होती. मात्र, आता ही ओळख पुसत चालली असून गुंडाचं ठाणं ही ठाण्याची नवी ओळख बनत चालली आहे. ठाण्यात आता तर महिला देखील गुंडगिरी करायला लागल्या आहेत. त्यामुळं ठाण्याचं काय होणार हा प्रश्न आहे. तोतयेगिरी आणि गुंडगिरी करणाऱ्यांची संख्या ठाण्यात जास्त आहेत. हा मिंधे गट महिलांकरवी हल्ले घडवून आणत आहे. सुप्रीम कोर्टान म्हणालं होतं की, राज्य सरकार नपुसंक आहे. तसे हे हल्ले करणारे देखील नपुसंक आहेत, अशी टीका ठाकरेंनी केली.
संभाजीनगरमधील दंगलीवरुन वळसे पाटालांनी फडणवीसांना सुनवाले
शिवसेना फुटीला अनेक महिने उलटून गेले तरी दोन्ही गटात काय राडा होण्याच्या घटना घडत आहेत. कालही ठाण्यात या दोन्ही गटात मोठा राडा झाला. सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पोस्ट टाकल्यामुळं गर्भवती असलेल्या रोशन शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली. रोशन शिंदे सायंकाळी ऑफीसमधून घरी परत येण्याची तयारी करत असतांना त्यांच्यावर ऑफीसच्या आवारात शिरून मारहाण करण्यात आली. या संदर्भात ठाकरेंनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, रोशनी मातृत्वासाठी उपचार घेत होत्या आणि त्यांच्या पोटांवर लाथा मारण्यात आल्या आहेत. गुंड महिला ह्या आपल्या संस्कृतीत बसत नाहीत. पोलिस आयुक्तांना भेटायला गेला तर कार्यालयात पोलिस आयुक्तचं नाहीत. एक फडतुस गृहमंत्री आपल्याला मिळला नाही. लाचार, लाळघोटेपणा करणारा मुख्यमंत्री नुसती फडणवीसी करत मिरवत आहेत. कारण, पण, त्यांच्या कार्यकर्त्यांवर मिधें गटाने हल्ला केला, तरी हे चुडीचुप आहेत. पत्रकारांना धमक्या दिल्या जात आहे. रोशनी यांच्याकडून माफीचा व्हिडिओ तयार करून घेतला. तरी त्यांना मारहाण करण्यात आली, आणि गृहमंत्री कुठलीच कारवाई करत नाही, सरकार खरचं नपुसंक असल्याची प्रचित आज येत आहे, असं ठाकरे म्हणाले.
मिधें गटाकडून हल्ला झाला तर तिकडे हे फडणवीसगिरी करत नाहीत. तिकडे हिंमत नाही. एकूणच काय तर गुंडागर्दीचे राज्य आहे. यांना मुख्यमंत्री म्हणाव की, गुंडमंत्री म्हणावं, हा प्रश्न आहे. शिवसैनिक शांत राहिले, याचा अर्थ असा नाही की शिवसैनिक पेटून उठणार नाही. आम्ही आता याक्षणी ठाण्यातून यांची गुंडगिरी मुळासकट उपटू शकतो. गृहमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी नाहीतर राजीनामा द्यावा. रोशनी यांची अद्याप पोलिसांनी एफआयआर घेतलेली नाही. पोलीस त्यांच्या कर्तव्यापासून काढत आहेत, त्यामळे ते काय जनतेचं रक्षण करणार… त्यामुळं ठाण्यात गुंडाराज आहे, असं दिसंत. पोलिसांना त्यांचं कर्तव्य करायची हिंमत नसेल तर बिनकामाच्या आयुक्तांना निलंबित करा किंवा त्यांची बदली करा, अशी मागणी त्यांनी केली.