संभाजीनगरमधील दंगलीवरुन वळसे पाटालांनी फडणवीसांना सुनवाले

संभाजीनगरमधील दंगलीवरुन वळसे पाटालांनी फडणवीसांना सुनवाले

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात श्रीराम नवमीला छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) मोठी दंगल झाली होती.यामध्ये एकाचा मृत्यू देखील झाला होता. यावरुन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) सुनावले आहे. राज्यातील जनता ही अतिशय समजूतदार आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका जर सरकारची राहिली तर राज्यात निश्चितपणे शांतता राहते, असे मत वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

ते पुढं म्हणाले, राज्यात वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम रस्त्यांवर येऊन केले जातात. त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतात. यातून काही अनुचित घटना घडतात. यापूर्वीच्या काळात आमच्या सूचना होत्या की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल घटना रस्त्यांवर घडणार नाहीत. काही कार्यक्रम कारायचा असेल तर तुमच्या स्वत:च्या भागात करा किंवा घरात करा. यातून नागरिकांनी सहकार्य केलं आणि शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्यात मदत केली, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

सगळ्यात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शेलारांचा पलटवार

दरम्यान, रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. जमावाने वाहनांची नासधूस केली. या हिंसाचारात एका जणाचा मृत्यू झाला होता. किराडपुरा परिसरात दगडफेक करत दोन गट एकमेकांना भिडले होते. दंगलीदरम्यान जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर करावा लागला होता. तसेच सौम्य लाठीमारही केला होत. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केले होते. हल्लेखोरांनी जवळपास 15 वाहनांचे नुकसान केले होते.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना मनसेने मशिदीवरील भोंग्याविरोधात आंदोलन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत त्या ठिकाणी हनुमान चालिसा पठन करण्यात आली होती. पण कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा घटना घडल्या नव्हत्या. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात श्रीराम नवमीला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दंगल झाली होती. त्यामुळे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube