मोठी बातमी! आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

Chandrababu Naidu Arrest : तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांना आज (शनिवार) भल्या पहाटेच अटक करण्यात आली. नायडू यांनी तब्बल 350 कोटी रुपयांच्या कौशल्य विकास घोटाळ्यात गु्न्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. नायडू यांच्या अटकेनंतर आंध्र प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. Andhra Pradesh | Criminal […]

बजेटआधीच चंद्रबाबूंना गुडन्यूज; सरकारनं दिलं मोठं गिफ्ट; बिहारचं काय होणार?

बजेटआधीच चंद्रबाबूंना गुडन्यूज; सरकारनं दिलं मोठं गिफ्ट; बिहारचं काय होणार?

Chandrababu Naidu Arrest : तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांना आज (शनिवार) भल्या पहाटेच अटक करण्यात आली. नायडू यांनी तब्बल 350 कोटी रुपयांच्या कौशल्य विकास घोटाळ्यात गु्न्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. नायडू यांच्या अटकेनंतर आंध्र प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

ईडीने केलेल्या तपासात हा घोटाळा सिद्ध झाला आहे. आंध्र प्रदेश पोलीस आणि सीआयडीच्या नेतृत्वात पोलिसांनी नायडू यांना ताब्यात घेतले. नायडू यांना अटक करण्यासाठी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आर. के. फंक्शन मॉल पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यावेळी नायडू येथे आराम करत होते.

पोलिसांना पाहताच टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. नायडू यांच्या अटकेला विरोध करण्यात आला. त्यानंतर नायडू यांच्या सुरक्षेतील एसपीजी यांनीही पोलिसांना नियमांचे पालन करण्यास सांगितले. पहाटे 5.30 वाजेपर्यंत ते नायडू यांच्या जवळ जाण्याची परवानगी कुणालाही देणार नाहीत असे सांगण्यात आले. त्यानंतर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी नायडू यांना त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधून ताब्यात घेण्यात आले.

Sameer Wankhede : समीर वानखेडेंना मोठा दिलासा, आर्यन खानप्रकरणात लाच घेतल्याच्या आरोपातून निर्दोष सुटका

डीआयजी यांनी सांगितले, की आंध्र प्रदेश कौशल्य विकास निगम घोटाळ्यात नायडू यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात नायडू हे पहिलेच आरोपी आहेत. अटक करण्याआधी त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. आता अटक केल्यानंतर त्यांना विजयवाडा येथे आणण्यात येणार आहे. याआधी आंध्र प्रदेशचे मंत्री आणि सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनी दावा केला की टीडीपी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्र्यांना लवकरच अटक केली जाईल.

Exit mobile version