Bangladesh violence : बांगलादेशात हिंसाचाराने रोद्ररूप धारण केलं आहे. (Bangladesh ) अनेकांची घर पेटून दिली जात आहेत. त्यामध्ये आता समोर आलेल्या बातमीनुसार बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मश्रफी मुर्तझा याच्या घराला आंदोलकांनी आग लावली. देशात सध्या सुरू असलेल्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि सुरक्षा दलांकडून विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन गोळ्या घातल्या जात आहेत.
कोण आहेत लष्करप्रमुख जनरल वकार? शेख हसीना यांच्यानंतर स्वीकारणार बांगलादेशची जबाबदारी
आंदोलकांनी सत्ताधारी अवामी लीग पक्षाचे खासदार मुर्तझा यांच्यावर बांगलादेशातील ‘विद्यार्थ्यांचे हत्याकांड आणि सामूहिक अटक’ यावर मौन बाळगल्याबद्दल संताप व्यक्त केला. यावेळी जिल्हा अवामी लीगचे कार्यालय आणि पक्षाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांचे निवासस्थानही जमावाने जाळलं. मोर्तझाने 117 सामन्यांमध्ये बांगलादेशचे कर्णधारपद भूषवलं आहे. देशासाठी सर्वाधिक सामन्यांमध्ये नेतृत्त्व करण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे.
50 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार?; शेख हसिना भारतात डेरेदाखल
आपल्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीत, त्याने 36 कसोटी, 220 एकदिवसीय आणि 54 T20 सामन्यांमध्ये 390 आंतरराष्ट्रीय विकेट घेत 2,955 धावा केल्या आहेत. निवृत्तीनंतर, त्याने 2018 मध्ये राजकारणात प्रवेश केला, हसिना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीगमध्ये सामील झाला आणि नरेल-2 मतदारसंघातून खासदार म्हणून विजय मिळवला. आंदोलकांनी त्याचा घरी जाऊन त्याच्या घराला आग लावली. त्याच घर आगीत जळत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
बांगलादेशमध्ये हिसांचाराने रौद्र रूप धारणं केलं आहे. आंदोलकांनी बांगलादेशचा क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मश्रफी मुर्तझा याच्या घराला आग लावली. #BangladeshViolence #Bangladesh #SheikhHasina pic.twitter.com/oOrfXuTlK5
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 6, 2024