Prajwal Revanna Rape Case : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने रेवण्णाला 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. घरकाम करणाऱ्या ४८ वर्षीय महिलेच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात रेवण्णाला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. महिला अत्याचार प्रकरणात रेवन्नाला कर्नाटकच्या खासदार- आमदार न्यायालयाने काल दोषी ठरवल्यानंतर आज (दि.2) जन्मठेप आणि 10 लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील फार्महाऊसमध्ये (Prajwal Revanna) मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी रेवण्णा गेल्या 14 महिन्यांपासून तुरुंगात आहेत.
Karnataka | Expelled JDS Leader and former Lok Sabha MP Prajwal Revanna sentenced to life imprisonment by the Special Court for People's Representatives in connection with a rape case of a domestic worker at a farmhouse in Holenarasipura in Hassan district
(file pic) pic.twitter.com/YGEVpwzICR
— ANI (@ANI) August 2, 2025
प्रकरण काय ?
लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्वल रेवन्ना यांचे कथित अश्लील फोटो असलेला पेन ड्राइव्ह व्हायरल झाला होता. या प्रकरणात एका महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. या प्रकरणात पोलिसांनी माजी खासदार रेवन्ना यांना 31 मे 2024 रोजी अटक केली होती. रेवन्ना यांच्यावर हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील एका फार्महाऊसमध्ये 48 वर्षीय मोलकरणीवर दोनदा बलात्कार केल्याचा आरोप होता.
रेवन्ना यांच्या पेन ड्राइव्हमध्ये सुमारे 2 हजार अश्लील व्हिडिओ असल्याचा आरोप आहे. रेवन्ना यांच्यावर प्रथम महिलांशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आणि नंतर व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. रेवन्ना यांच्याविरुद्ध पहिली तक्रार एप्रिल 2024 मध्ये करण्यात आली होती. महिलेने आरोप केला होता की रेवन्ना 2021 पासून तिच्यावर बलात्कार करत होता.
Video : राज ठाकरेंना अर्बन नक्षलवादी म्हणून अटक करणार?; ठाकरेंच्या चॅलेंजवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
साडी ठरली महत्त्वाचा पुरावा
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे घटनेच्या वेळी पीडितेने घातलेली साडी ही ठरली आहे. तपासात त्या साडीवर शुक्राणूंचे (स्पर्मचे) डाग आढळून आले आहेत. जे फॉरेन्सिक तपासणीमध्ये रेवण्णाचे असल्याचं समोर आलं आहे. मोलकरणीची ती साडी मोठा पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आली होती. हा सर्वात मोठा पुरावा मानला गेला. त्याचबरोबर बलात्काराचे व्हिडिओ देखील कोर्टात सादर करण्यात आले होते. पीडितेने केवळ साडी जपून ठेवली नाही. तर तिने या घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्डही केला होता.
अत्याचार प्रकरणाची टाईमलाईन
२१ एप्रिल २०२४ : हसनमधील लोकांना काही पेन ड्राइव्ह वाटण्यात आले. ज्यात अश्लील व्हिडिओ क्लिप्स असल्याचा आरोप. हे व्हिडिओ प्रज्वल रेवण्णाशी संबंधित असल्याचे सांगितले जात होते आणि तेव्हापासून हे प्रकरण वेगाने वाढू लागले.
२२ एप्रिल २०२४ : या पेन ड्राइव्हमधील काही निवडक व्हिडिओ मोबाईल आणि व्हॉट्सअॅपवर शेअर होऊ लागले. व्हिडिओमध्ये प्रज्वल रेवण्णा अनेक महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसून आले.
२३ एप्रिल २०२४ : दिवसभरात आणखी व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यामुळे संपूर्ण हसन जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
२३ एप्रिल २०२४ : एका महिलेने प्रज्वल रेवण्णाविरुद्ध हसन सेंट्रल एन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणातील ही पहिली अधिकृत तक्रार होती.
२६ एप्रिल २०२४ : या दिवशी, प्रज्वल रेवण्णा यांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केले, माध्यमांशी संवाद साधला आणि कुटुंबाच्या अंत्यसंस्कारातही सहभागी झाले.
२७ एप्रिल २०२४ : प्रज्वल रेवण्णा देश सोडून पळून गेले. पोलिसांना त्याच्याविरुद्धच्या तक्रारीची माहिती मिळाली असतानाही, त्यांनी बेंगळुरूहून जर्मनीला विमानाने प्रवास केला.
२७ एप्रिल २०२४ : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले.
२८ एप्रिल २०२४ : होलेनरसीपुरा येथे पहिला एफआयआर दाखल करण्यात आला, ज्यामध्ये प्रज्वलला आरोपी क्रमांक २ आणि त्याचे वडील एचडी रेवन्ना यांना मुख्य आरोपी म्हणून नाव देण्यात आले. प्रकरण ताबडतोब एसआयटीकडे सोपवण्यात आले.
२९ एप्रिल २०२४ : पीडितेने न्यायालयात दंडाधिकाऱ्यांसमोर कलम १६४ अंतर्गत तिचा जबाब नोंदवला. बलात्कार, धमक्या आणि व्हिडिओ व्हायरल करण्याबद्दल माहिती दिली
३० एप्रिल २०२४ : एसआयटीने प्रज्वल यांना नोटीस पाठवली आणि २४ तासांच्या आत हजर राहण्याचे निर्देश दिले. ही नोटीस थेट त्याच्या घरी पाठवण्यात आली.
१ मे २०२४ : प्रज्वल यांच्या वकिलाने एक आठवड्याचा वेळ मागितला पण, एसआयटीने नकार दिला. त्याच दिवशी सीआयडी सायबर क्राइम पोलिस स्टेशनमध्ये दुसरा एफआयआर नोंदवण्यात आला.
एआयमुळे रोजगार संकटात! अनसेफ अन् सेफ नोकऱ्यांची यादी मिळाली; मायक्रोसॉफ्टचा अहवाल
२ मे २०२४ : एसआयटीने एक लूकआउट सर्क्युलर जारी केला जेणेकरून प्रज्वल रेवण्णा देशाबाहेर पळून जाऊ नये, जरी तो आधीच जर्मनीला गेला होता.
४ मे २०२४ : इंटरपोलशी संपर्क साधून प्रज्वलविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली, जेणेकरून त्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रॅक करता येईल.
७ मे २०२४ : आणखी एका महिलेने सीआयडी सायबर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यावेळी पीडित ४४ वर्षीय जेडीएस कार्यकर्त्याने बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
१८ मे २०२४ : स्थानिक न्यायालयाने प्रज्वल यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. जेणेकरून एसआयटी परदेशातून रेवण्णांना आणण्याची प्रक्रिया सुरू करू शकेल.
२४-२५ मे २०२४ : एसआयटीने प्रज्वल यांचा राजकीय पासपोर्ट रद्द करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठवले. मंत्रालयाने पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि नोटीस पाठवली.
२७ मे २०२४ : प्रज्वलने जर्मनीहून एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला आणि तो निर्दोष असल्याचे आणि लवकरच भारतात परतणार असल्याचे सांगितले.
३१ मे २०२४ : भारतात परतताच बेंगळुरू विमानतळावर एसआयटीकडून रेवण्णा यांना अटक. विशेष म्हणजे अटक करणाऱ्या पथकातील सर्व अधिकारी महिला होत्या.
जून २०२४ मध्ये, सुमारे ६० वर्षांच्या तिसऱ्या महिलेनेही एसआयटीकडे बलात्काराची तक्रार दाखल केली. या प्रकरणातही आयपीसीचे कलम ३७६, ३५४ सी आणि ५०६ लावण्यात आले.
एसआयटी तपास आणि आरोपपत्र
तिन्ही प्रकरणांमध्ये, एसआयटीने इलेक्ट्रॉनिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे तपास पूर्ण केला आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
३१ डिसेंबर २०२४ रोजी प्रज्वल रेवण्णा विरुद्धच्या खटल्याची औपचारिक सुरुवात झाली. न्यायालयाने व्हिडिओ, पीडितेचे म्हणणे आणि डीएनए पुराव्यांच्या आधारे सुनावणी सुरू केली. १ ऑगस्ट २०२५ रोजी ७ महिन्यांच्या प्रदीर्घ खटल्यानंतर न्यायालयाने प्रज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले त्यानंतर आज रेवण्णा यांना जन्मठेप आणि 10 लाखांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.