Download App

लालू यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी दिली मोठी कबुली; ‘या’ तरुणीच्या १२ वर्षापासून प्रेमात

मी बऱ्याच दिवसांपासून हे तुम्हा सर्वांना सांगू इच्छित होतो, पण ते कसे सांगावे हे मला समजत नव्हते. म्हणून आज या पोस्टच्या

Former Minister Tej Pratap Yadav : बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव (Minister) यांनी त्यांच्या नव्या रिलेशनशिपची घोषणा केली, फेसबुकवर पोस्ट लिहून त्यांनी अनुष्का यादवसोबत 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं. त्या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तेज प्रताप यादव हे लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव आहेत. बिहारमध्ये मंत्रिपदही भूषवलं आहे. त्यांचे या आधीच लग्नही झाले असून ते आता मोडण्याच्या वाटेवर आहे. त्यातच तेज प्रताप यादव यांनी दुसऱ्या नात्याची कबुली दिली आहे.

तेज प्रताप यादव यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होतं की, अनुष्का यादव आणि मी गेल्या 12 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि एकमेकांवर प्रेम करतो. आम्ही गेल्या 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत. बऱ्याच दिवसांपासून हे सर्वांना सांगायची इच्छा होती, पण कसं सांगावं हे समजत नव्हतं.

‘देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून येणाऱ्या प्रेमाने भारावलोच वॉर 2 च्या टीझरवर NTR ची प्रतिक्रिया

मी बऱ्याच दिवसांपासून हे तुम्हा सर्वांना सांगू इच्छित होतो, पण ते कसे सांगावे हे मला समजत नव्हते. म्हणून आज या पोस्टच्या माध्यमातून मी माझ्या मनातील भावना तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे. मला आशा आहे की माझ्या भावना तुम्ही समजून घ्याल असंही ते म्हणाले आहेत.

याआधी तेज प्रताप यादव यांचे 2018 मध्ये लग्न झालं होतं. परंतु, काही महिन्यांनंतर पत्नी ऐश्वर्या आणि तेज प्रताप यांच्यातील मतभेद टोकाला गेले आणि वादामुळे त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला. या दोघांच्यातील घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. मात्र, आता नवीन नात्यानंतर तेज प्रताप यादव आणि अनुष्का यादव प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.

राजद नेता तेज प्रताप यादव याने त्यांची फेसबुक पोस्ट डिलीट केली असली तरी, त्याच्या पोस्टचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला. सोशल मीडियावर त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. तेज प्रताप यादव भविष्यात अनुष्का यादवशी लग्न करू करणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

follow us