माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग यांच्या मुलाचा कार अपघात, सुनेचा मृत्यू

Jaswant Singh : माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग (Jaswant Singh) यांचा मुलगा काँग्रेस नेते मानवेंद्र सिंग जसोल (Manvendra Singh Jasol) यांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात मानवेंद्र सिंग जसोल यांच्या पत्नी चित्रा सिंग यांचा मृत्यू झाला आहे. तर मानवेंद्र सिंग आणि त्यांच्या मुलासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मानवेंद्र यांच्या कारचा अपघात राजस्थानच्या […]

Jaswant Singh

Jaswant Singh

Jaswant Singh : माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग (Jaswant Singh) यांचा मुलगा काँग्रेस नेते मानवेंद्र सिंग जसोल (Manvendra Singh Jasol) यांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात मानवेंद्र सिंग जसोल यांच्या पत्नी चित्रा सिंग यांचा मृत्यू झाला आहे. तर मानवेंद्र सिंग आणि त्यांच्या मुलासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मानवेंद्र यांच्या कारचा अपघात राजस्थानच्या (Rajasthan) अलवर जिल्ह्यात झाला. ते दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अलवर जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील खुशपुरीजवळ हा अपघात झाला. या अपघाताचा एक फोटोही समोर आला आहे, यामध्ये मानवेंद्र सिंग जसोल गंभीर जखमी अवस्थेत दिसत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मानवेंद्र सिंग जसोल आपल्या कुटुंबासह दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरून जात होते. यावेळी हा अपघात झाला. घटनास्थळाची काही छायाचित्रेही समोर आली आहेत. यामध्ये डिव्हायडरला धडकल्यानंतर कारचे नुकसान झालेले दिसत आहे. ही कार काँग्रेस नेते मानवेंद्र सिंग जसोल यांची असल्याचे समजते.

मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; सर्वेक्षण करण्यास आणखी दोन दिवसाची मुदतवाढ

काँग्रेस नेते मानवेंद्र सिंग जसोल, त्यांचा मुलगा सोलंकी सिंग आणि अपघातात जखमी झालेल्या चालकावर अलवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मानवेंद्र सिंग यांच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे.

‘…तर ओबीसी समाजाला विष देऊन मारुन टाका’; वडेट्टीवारांचा CM शिंदेंवर प्रहार

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या अपघातावर दुख: व्यक्त केले आहे. गेहलोत यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘मानवेंद्र सिंह जसोल यांच्या पत्नी चित्रा सिंह यांच्या रस्ता अपघातात निधन झाल्याची बातमी दुःखद आहे.रस्ता अपघातात जखमी झालेले मानवेंद्र सिंग जसोल आणि इतर कुटुंबीय लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.

Exit mobile version