मोठी बातमी! राजस्थानमध्ये Operation Shield रद्द; कारण काय?

मोठी बातमी! राजस्थानमध्ये Operation Shield रद्द; कारण काय?

Operation Shield : गुरुवार 29 मे रोजी पाकिस्तानच्या सीमेला लागून असणाऱ्या राजस्थानमध्ये ‘ऑपरेशन शील्ड’ अंतर्गत मॉक ड्रिल (Mock Drill) होणार होती मात्र आता या मॉक ड्रिलबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, 29 मे रोजी राजस्थानमध्ये  (Rajasthan) आयोजित करण्यात आलेली मॉक ड्रिल आता होणार नाही. या सरावास तूर्तास पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती राजस्थान सरकारकडून देण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने एका प्रेस नोटमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

प्रशासकीय कारणांमुळे हा सराव पुढे ढकलण्यात आला आहे आणि सरावाच्या पुढील तारखा नंतर जाहीर केल्या जातील. अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

नागरी संरक्षण सराव अंतर्गत, गुरुवारी (29 मे) राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा ‘ब्लॅक आउट’ आणि ‘मॉक ड्रिल‘ करण्याची योजना आखण्यात आली होती. यानुसार गुरुवारी संध्याकाळी राज्यातील सर्व 41  जिल्ह्यांमध्ये ‘मॉक ड्रिल’ आणि ‘ब्लॅक आउट’ आयोजित करण्यात येणार होते आणि याबाबत  नागरी संरक्षण विभागाने सीमावर्ती जिल्ह्यांच्या सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली होती.

अधिकृत निवेदनानुसार, नागरी संरक्षण विभागाने सर्व सीमावर्ती जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना ‘ब्लॅक आउट’ आणि ‘मॉक ड्रिल’ बाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. मात्र आता काही प्रशासकीय कारणांमुळे हा सराव पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल 

तर दुसरीकडे पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 7 मे रोजी देशातील 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, पण 6-7 मे च्या रात्री भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर ऑपरेशन सिंदूर राबवत लष्करी कारवाई केली आणि या कारवाईत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर भारताने हवाई हल्ले केले होते.

नवीन पेन्शन योजना…, गुंतवणूकदारांना मिळणार बोनस, टॉप-अप आणि PPF सारखे फायदे; जाणून घ्या कसं

follow us
  • fb
  • instagram
  • youtube