Download App

नायडू यांचा उपराष्ट्रपतीपदापर्यंतचा अनुभवसंपन्न प्रवास; पंतप्रधानांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन

माजी उपराष्ट्रपती आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एम. व्यंकय्या नायडू यांच्या पुस्तकावरील प्रकाशन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झालं.

Venkaiah Naidu :  शेतकऱ्याचा मुलगा ते देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद आणि त्याहीपुढे देशाचे (Venkaiah Naidu ) उपराष्ट्रपतीपद हा व्यंकय्या नायडू यांचा प्रवास अनेक अनुभवांनी समृद्ध ठरला आहे, (PM Modi) असं प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केल आहे.

कोण होणार शिक्षक आमदार?, नाशिक विभागात आज मतमोजणी, प्रशासन सज्ज

माजी उपराष्ट्रपती आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एम. व्यंकय्या नायडू यांच्या पुस्तकावरील प्रकाशन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झालं, या निमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. नायडू यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त येथे एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नायडू यांनी आणीबाणीच्या काळात भोगलेल्या तुरुंगवासाचा उल्लेखही केला. काँग्रेसने लादलेली आणीबाणी म्हणजे राज्यघटनेला लांच्छन लावण्याचा प्रयत्न होता. या काळात नायडू हे देखील आणीबाणीविरोधातील लढ्यात सहभागी झाले होते. इतकेच, नव्हे तर त्यांनी त्यासाठी १७ महिन्यांचा तुरुंगवासही भोगला होता.

पेपरफुटीला बसणार आळा! कठोर कायदा लागू; दहा वर्षे कारावास अन् एक कोटी दंड

नायडू यांचे जीवनचरित्र सांगणारे पुस्तक प्रकाशित होत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला. हे पुस्तक लोकांना देशसेवेसाठी मार्गदर्शक ठरेल, असं प्रतिपादनही पंतप्रधान मोदी यांनी केलं. तसंच, पंतप्रधान मोदी म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सत्ताकाळात व्यंकय्या नायडू हे पक्षातील वरिष्ठ नेते असल्याने त्यांना कोणतेही मंत्रिपद मिळणं शक्य होतं. मात्र, त्यांनी ग्रामीण विकास मंत्रालय मागून घेतलं, कारण त्यांच्या मनात ग्रामीण जनतेची, शेतकऱ्यांची आणि गरिबांची सेवा करण्याची नितांत तळमळ आहे असंही मोदी यावेळी म्हणाले आहेत.

follow us