foundation of a united India history of Delhi Gymkhana Club, which under radar of central government : केंद्र सरकारने लुटियन्स दिल्लीतील ऐतिहासिक दिल्ली जिमखाना क्लबला 5 जूनपर्यंत परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र हा दिल्ली जिमखाना क्लब नेमका काय आहे? त्याचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर…
केंद्र सरकारच्या भूमी आणि विकास कार्यालयाने 22 मे रोजी क्लबच्या सचिवांना पत्र पाठवून दिल्ली जिमखाना क्लबला 5 जूनपर्यंत जमीन आणि संपूर्ण कॅम्पस रिकामा करण्याचे निर्देश दिले आहेत. ही जमीन क्लबला सामाजिक आणि क्रीडा उपक्रमांसाठी क्लब चालवण्याच्या उद्देशाने भाडेपट्ट्यावर देण्यात आली होती. मात्र आता भारताच्या राष्ट्रपतींनी लीज डीडमधील अधिकारांचा वापर करत हा भाडेपट्टा रद्द करण्याचे आणि परिसर तात्काळ सरकारच्या ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्ली जिमखाना क्लबचा इतिहास
दिल्ली जिमखाना क्लबचा इतिहास हा दिल्ली देशाची राजधानी बनली त्या इतिहासाइतकाच जुना मानला जातो. 1911 मध्ये ब्रिटनचे राजा जॉर्ज पंचम यांनी भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्याची घोषणा केली. त्यानंतर नव्या राजधानीसाठी प्रशासकीय आणि सामाजिक रचनेची गरज निर्माण झाली आणि 1913 मध्ये “इम्पीरियल दिल्ली जिमखाना क्लब”ची स्थापना करण्यात आली. हा क्लब ब्रिटिश सैन्य अधिकारी आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आला होता. या क्लबच्या स्थापनेत ग्वाल्हेर, जयपूर, जोधपूर, काश्मीर, उदयपूर, किशनगडचे महाराज आणि भोपाळच्या नवाबांचा मोठा सहभाग होता. त्यांना क्लबचे लाइफ मेंबर बनवण्यात आले होते.
1930 च्या दशकात प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुशिल्पकार रॉबर्ट रसेल यांनी सफदरजंग रोडवरील सध्याच्या इमारतीची रचना तयार केली. त्यांनीच कनॉट प्लेस आणि तीन मूर्ती भवन परिसराची डिझाइनही केली होती. क्लबची रचना लुटियन्स दिल्लीतील बंगल्यांच्या शैलीशी सुसंगत ठेवण्यात आली होती. तर तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड विलिंग्टन यांच्या पत्नी लेडी विलिंग्टन यांनी 21 हजार रुपयांची देणगी देऊन स्विमिंग पूल आणि स्क्वॅश कोर्ट बांधून घेतले. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ तिथे स्विमिंग पूलला लेडी विलिंग्टन स्विमिंग बाथ आणि स्क्वॅश कोर्टला द विलिंग्डन स्क्वॅश कोर्ट्स नाव देण्यात आलेले आहे.
विरोधकांनंतर आता सत्ताधाऱ्यांचाच सवाल; उदयनराजेंनी लाडकी बहीण योजनेवर व्यक्त केली चिंता
ब्रिटिश काळात हा क्लब केवळ मनोरंजनाचे ठिकाण नव्हते, तर सत्ता आणि सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जात होते. आयसीएस अधिकाऱ्यांसाठी येथे सदस्यत्व मिळणे प्रतिष्ठेचे मानले जात असे. इंग्रजी जीवनशैली, डान्स, संडे ब्रंच आणि टेनिस कोर्टवरील नेटवर्किंग ही येथे प्रतिष्ठेची चिन्हे होती.
नीट पेपरफुटीतील मनीषा हवालदार मोबाईलमधील ‘गॉड’ नावाने सेव्ह नंबरचं गुढ उकललं
मात्र, या क्लबमध्ये वर्णभेद होता. 1946 मध्ये भारतीय अधिकारी लॉनमध्ये बसत असत, तर ब्रिटिश अधिकारी इमारतीच्या आत. स्वातंत्र्यानंतर क्लबच्या नावातील “इम्पीरियल” शब्द हटवण्यात आला. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे क्लबचे व्हाइस-पॅट्रन बनले. तेव्हा त्यांनी येथे इंग्रजी खाद्यपदार्थांसोबत भारतीय, चायनीज आणि थाई पदार्थांचाही समावेश केला.
पुण्यात 26 मेपासून 14 दिवस जमावबंदी; आंदोलन-मोर्चांवर बंदी, इंधन बचतीसाठी मनपाचे कठोर आदेश
जिमखाना क्लबचे केक, पेस्ट्री, बटर चिकन, रोगन जोश, बिर्याणी आणि दाल मखनी हे पदार्थ विशेष लोकप्रिय होते. येथे तयार होणाऱ्या डिशेसची गुणवत्ता फाइव्ह स्टार हॉटेल्सलाही टक्कर देणारी मानली जात होती. या क्लबचे सदस्यत्व मिळवण्यासाठी अनेक दशकांची प्रतीक्षा करावी लागत असे. 1970 च्या दशकात अर्ज केलेले काही लोक आजही वेटिंग लिस्टमध्ये असल्याचे सांगितले जाते.
अभिनेता आदिनाथ कोठारेच्या “सिस्टम” चित्रपटाच्या कास्टिंगची फिल्मी गोष्ट…
तर याच क्लबमध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. त्यातील मुख्य घडामोडींपैकी एक म्हणजे दिल्ली जिमखाना क्लब हा केवळ क्रीडा आणि ऐश्वर्याचे केंद्र नव्हता, तर भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचाही महत्त्वाचा साक्षीदार ठरला आहे. याच ठिकाणी महात्मा गांधी आणि लॉर्ड आयर्विन यांच्यात चर्चा होऊन 1931 मधील ऐतिहासिक गांधी-आयर्विन करार झाला होता.
तसेच स्वातंत्र्यानंतर देशातील 500 हून अधिक संस्थानांचे भारतात विलीनीकरण करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचे सहकारी व्हीपी मेनन यांनी याच क्लबमध्ये महत्त्वाच्या गुप्त बैठका घेतल्या. याच चर्चांमधून अखंड भारताच्या निर्मितीचा मार्ग तयार झाला.
