आसगावात सुन्न करणारा आक्रोश; आंबेनळी घाटात एकाच गल्लीतल्या 5 तरुणांचा मृत्यू, नागरिकांचा सरकारवर आरोप
या अपघातात मृत्यू पावलेले पाज जणही एकाच गावातील एकाच रस्त्यावर राहणारे होते. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
रायगडच्या आंबेनळी घाटात दुर्घटना समोर आली आहे. (Satara) या घाटात भीषण अपघात घडला असून स्कॉर्पिओ गाडी तब्बल 1200 फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आणि या भीषण अपघातात सातारा तालुक्यातील आसगाव गावातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या अपघातात मृत्यू पावलेले पाज जणही एकाच गावातील एकाच रस्त्यावर राहणारे होते. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. गावात सर्वत्र दु:खाच वातावरण आहे. महिलांचा हंबरडा, नातेवाईकांचा आक्रोश आणि सुन्न झालेली गावकऱ्यांची मनस्थिती, हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक आहे. परंतु, या गावातील गावकरी आणि या कुटुंबातील सदस्यांनी या झालेल्या घटनेमध्ये शासनाला जबाबदार धरलं आहे.
ब्रेकिंग : अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणावेळी हँड ग्रेनाईडचा स्फोट; 4 जण जखमी
रस्त्याला संरक्षण कठडे नसल्यामुळे ही दुर्दैवी घटना झाल्याचे भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच पद्धतीने मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार शासनाने द्यावा, अशी अपेक्षा अनेक गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेत आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त युवकांमध्ये पाचजण युवक हे आसगाव, ता. सातारा, जि. सातारा येथील रहिवासी असून 2 युवक मर्ढे या गावातील असून 1 व्यक्ती हा खटाव येथील आहे.
मृतांमध्ये महेश अनिल पवार (वय 25), आदित्य अशोक साळुंखे (वय 21), रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25), सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20), अंश समीर चव्हाण (वय 18), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21), प्रवीण अभिमन्यू शिंगटे (वय 25) आणि संदीप काटकर (वय 35) यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात काल (24 मे) रात्री घडला. सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील तरुण या स्कॉर्पिओ जीपने प्रवास करत होते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार आंबेनळी घाटात थेट 1200 फूट खोल दरीत जाऊन कोसळली. यामध्ये गाडीतील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.
रविवारी रात्री दोन वाजता दरीतून मृतदेह वर काढण्याचे काम सुरु झाले. मात्र, रात्रीच्या अंधारात बऱ्याच अडचणी येत होत्या. अखेर, सोमवारी सकाळी ट्रेकर्स आणि बचाव पथकांनी हे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यास सुरुवात केली. दोरीला स्ट्रेचर बांधून दरीतून एक-एक मृतदेह वर आणण्यात आला. हे सर्व मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत.