Four Jawan Died : लष्कराचे वाहन दरीत कोसळले, भारतीय लष्कराचे चार जवान ठार

सिक्कीममधील (Sikkim) पाकयोंग जिल्ह्यातील जुलुक या सिल्क रुटवर झालेल्या अपघातात भारतीय लष्कराचे किमान चार जवान ठार झाले.

Four Soldier Died

Four Soldier Died

Four Indian Army Personnel Died in Road Accident : सिक्कीममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिक्कीममधील (Sikkim) पाकयोंग जिल्ह्यातील जुलुक या सिल्क रुटवर झालेल्या अपघातात भारतीय लष्कराचे चार जवान ठार झाले. अधिका-यांनी सांगितले की, लष्कराचे वाहन सिल्क रूटवरील दलोपचंद दरीत कोसळल्याने हा अपघात झाला आणि जवान मृत्युमुखी पडले. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

दिग्दर्शकावर तमिळ अभिनेत्रीने केला बलात्काराचा आरोप; म्हणाली, ‘जगासमोर मला मुलगी म्हणायचा अन्…’ 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी भारतीय लष्कराचे चार जवान पश्चिम बंगालमधील पेडोंग येथून सिक्कीममधील पाकयोंग जिल्ह्यातील जुलुककडे जात होते. त्याचवेळी राज्य महामार्गावरील दलोपचंद दरीत लष्कराचे वाहन सुमारे 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळले. यावेळी वाहनात लष्काचे चार जवाव होते.

मृतांची नावे खालीलप्रमाणे-
चालक प्रदीप पटेल (मध्य प्रदेश), डब्ल्यू पीटर (मणिपूर), नाईक गुरसेव सिंग (हरियाणा) सुभेदार के थंगापांडी (तामिळनाडू) अशी मृत जवानांची नावे आहेत. सर्व मृत लष्करी जवान पश्चिम बंगालमधील बिनागुरी येथील तुकडीतील होते.

जवानांच्या निधनामुळे लष्करावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, भारतीय लष्कराने अन्य जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे.

Exit mobile version