Dunki Flight Case : मानवी तस्करीच्या संशयावरून भारतीय प्रवाशांचं विमान फ्रान्समध्ये रोखण्यात (Dunki Flight Case) आलं. विमानातील प्रवाशांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. त्यानंतर मंगळवारी सकाळी विमान मुंबईत दाखल झालं. या विमानात 276 प्रवासी होते. आता या प्रकाराबात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. हा प्रकार नेमका काय होता. या मागचा मास्टरमाइंड कोण, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तसं पाहिलं तर या विमानात पंजाब, हरियाणा, गुजरात आणि दक्षिण भारतातील प्रवासी जास्त संख्येने होते. आता हे प्रवासी त्यांच्या गावी निघाले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितलं की ज्या व्यक्तीने रोमानिया एअरलाइन्सकडून हे विमान भाडोत्री घेतलं होतं तो व्यक्ती अजूनही परतलेला नाही. हाच व्यक्ती प्रवाशांना दुबई येथून निकारागुआ येथे घेऊन जात होता. निकारागुआतून त्यांना पुढे अमेरिका आणि कॅनडात बेकायदेशीरपणे प्रवेश मिळवून देण्याची योजना होती.
France : भारतीय प्रवाशांचे विमान फ्रान्सने रोखले, प्रवाशांची कसून चौकशी; धक्कादायक कारण समोर
विमानात होते 303 प्रवासी
विमान फ्रान्समध्ये रोखण्यात आलं होतं. त्यानंतर फ्रान्सच्या सुरक्षा यंत्रणांनी प्रवाशांची चौकशी सुरू केली. या विमानात 303 भारतीय प्रवासी होते. यातील 276 प्रवासी पुन्हा भारतात परतले. चौकशी झाल्यानंतर चार दिवसांनी विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. यातील 27 प्रवाशांनी फ्रान्स सरकारकडे आत्मसमर्पण केले. त्यांची विनंती फ्रान्स सरकारने स्वीकारली.
चौकशी कशी झाली
रोमानियाची लिजेंड एअरलाइन्स द्वारा संचालित विमान इंधन भरण्यासाठी 21 डिसेंबर रोजी फ्रान्समधील वॅट्री विमानतळावर थांबले होते. फ्रान्सच्या यंत्रणांना गुप्त माहिती मिळाली होती की या विमानाद्वारे मानवी तस्करी होत आहे. यंत्रणांना लगेचच विमान रोखले आणि प्रवाशांची चौकशी सुरू केली. या घटनेने जगभरात खळबळ उडाली.
France Violence : वाहतूक नियम मोडला तर थेट गोळीच; जाणून घ्या, फ्रान्समध्ये असं का घडतंय?
मास्टरमाइंड कोण
हैदराबाद येथील कुणीतरी व्यक्ती या सगळ्या प्रकाराचा मास्टरमाइंड असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारतीय तपासी यंत्रणांच्या माहितीनुसार, शशि किरण रेड्डी या प्रकरणाशी संबंधित असण्याची शक्यता आहे. मानव तस्करीच्या एका प्रकरणात मागील वर्षातही रेड्डीचे नाव आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शशि किरण रेड्डी मागील 15 वर्षांपासून मानव तस्करीत सहभागी आहे. निकारागुआकडे जाणाऱ्या विमान प्रकरणाचाही तो मास्टरमाइंड असण्याची शक्यता आहे. रेड्डीचं काम अशा लोकांना पाठवणं आहे जे अवैध पद्धतीने दुबईमार्गे अमेरिकेत जाण्यास इच्छुक असतात.
डिंगुचा प्रकरण नेमकं काय
हैदराबादचा शशि किरण रेड्डी 2022 मधील डिंगुचा प्रकरणातही आरोपी आहे. या प्रकरणात पुरेसे पुरावे न मिळाल्याने त्याला सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणानेही जगभरात खळबळ उडाली होती. युएस-कॅनडा सीमेवरून अवैध पद्धतीने अमेरिकेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात गुजरात येथील एका कुटुंबातील काही जणांचा मृत्यू झाला होता.
या विमानातील 303 प्रवाशांपैकी 96 प्रवासी गुजरातचे होते. मागील दोन महिन्यांच्या काळात निकारागुआ येथून 800 लोकांना बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश मिळवून दिल्याचा आरोप रेड्डीवर आहे. तो आधी 50 सीटांच्या विमानातून तस्करी करत होता. फ्रान्सच्या अधिकाऱ्यांना संशय होता. त्यामुळेच त्यांनी विमानाच्या उड्डाणास नकार दिला होता. त्यामुळे विमानाला पु्न्हा दुबईला यावं लागलं.
हुश्श..! फ्रान्समध्ये अडकलेल्या भारतीय प्रवाशांची सुटका; 4 दिवसांनंतर विमान मुंबईत