Anil Ambani : LIC प्रकरणात तब्बल 2,684 कोटी रुपयांची फसवणूक; अनिल अंबानींवर गुन्हा दाखल

Anil Ambani :  देशातील राजकारणात पुन्हा एकदा अनिल अंबानी चर्चेत असून त्यांच्या अडचणीत आता मोठी वाढ होताना दिसत आहे. सीबीआयने

Anil Ambani

Anil Ambani

Anil Ambani :  देशातील राजकारणात पुन्हा एकदा अनिल अंबानी चर्चेत असून त्यांच्या अडचणीत आता मोठी वाढ होताना दिसत आहे. सीबीआयने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने रिलायन्स कॅपिटल लिमिटेड (RCAP) चे माजी अध्यक्ष अनिल अंबानी, माजी समूह व्यवस्थापकीय संचालक सतीश सेठ, अत्रात सरकारी अधिकारी आणि इतरांविरुद्ध  ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने (LIC) केलेल्या 2,648 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीशी संबंधित कथित फसवणुकी प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

प्रवक्त्याने काय म्हटले?

अधिकृत निवेदनात प्रवक्त्याने म्हटले आहे की, “सीबीआयने नोंदवलेला एफआयआर (FIR) रिलायन्स कॅपिटल लिमिटेडशी संबंधित आहे. अनिल अंबानी यांनी 2005 ते नोव्हेंबर 2021 या काळात रिलायन्स कॅपिटल लिमिटेडच्या संचालक मंडळावर ‘नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर’ किंवा अध्यक्ष म्हणून काम पाहिले. नोव्हेंबर 2021 मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली.” प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, अनिल अंबानी यांनी कोणताही गैरप्रकार केल्याचा इन्कार केला असून त्यांनी आपले सर्व कायदेशीर अधिकार राखून ठेवले आहेत.

नेमकं आरोप काय?

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 12  एप्रिल 2012 ते 9 मार्च 2018 या कालावधीत रिलायन्स कॅपिटल लिमिटेडने जारी केलेले एकूण 3,900 कोटी रुपये मूल्याचे पाच ‘नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स’ (NCDs) खरेदी केले होते. ही गुंतवणूक सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टे, निधीची गरज आणि विद्यमान कर्जाची पुनर्वित्त व्यवस्था (Refinancing) यासाठी करण्यात आली होती.

सीबीआयने आरोप केला आहे की, आरोपींनी गुन्हेगारी कट रचला आणि फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात, गुन्हेगारी गैरवर्तन, निधीचा गैरवापर/अपहार आणि खात्यांमध्ये फेरफार यांसारखे विविध गुन्हे केले. तर दुसरीकडे एलआयसीने दावा केला आहे की, आरोपींनी चुकीची माहिती देऊन कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले आणि त्यानंतर तो निधी इतर खात्यांमध्ये वळवला. या कथित कृत्यांमुळे LIC चे 2,684 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले.

IPL 2027 ‘या’ दिवशी होणार लिलाव; खेळाडूंवर लागणार कोट्यवधी रुपयांची बोली

यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल

सीबीआयने सांगितले की, विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ‘एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन’ (EPFO) आणि LIC कडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे त्यांनी यापूर्वी रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड, रिलायन्स कॅपिटल लिमिटेड, रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड यांच्याविरुद्ध आठ एफआयआर दाखल केले होते. या प्रकरणांच्या संदर्भात आतापर्यंत सहा आरोपपत्रे दाखल करण्यात आली असून सात जणांना अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version