Delhi Police : विद्यार्थ्यांवर लाठीमार करायचा नाही…म्हणून पठ्ठ्याने पोलिसाची नोकरी सोडली

दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार करायचा नाही म्हणून पठ्ठ्याने थेट पोलिसाची नोकरी सोडल्याची प्रकार दिल्लीतून समोर आला आहे.

Untitle (16)

Delhi Police : दिल्लीत नीटच्या मुद्द्यावर सुरु असलेल्या आंदोलनात हिंसाचाराची घटना घडली. या घटनेचे देशभरात पडसाद उमटत असतानाच एका पठ्ठ्याने विद्यार्थ्यांवर लाठीमार करायचा नाही, म्हणून पोलिसाची नोकरी (Delhi Police) सोडण्याचा निर्णय घेतलायं. एवढंच नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्तव्यावर बोलावलेले असताना आजच पोलिसाच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. हा पोलिस अधिकारी सब इन्स्फेक्टर म्हणून दिल्ली पोलिसांत कार्यरत होता. विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय पाहुन पठ्ठ्याने थेट पोलिसाच्या नोकरी लाथ मारलीयं. एका माध्यमाशी बोलताना या पठ्ठ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मोहित असं या पोलिस अधिकाऱ्याचं नाव असून मोहित दिल्ली पोलिसांत सब इन्स्पेक्टर होता. आंदोलन सुरु होण्याआधीपासूनच मोहित मेडिकल रजेवर होता. नीटच्या मुद्द्यावर दिल्लीत आंदोलन होणार, याची कल्पना मोहितला आधीच लागलेली होती. त्यामुळे मोहितने आधीच मेडिकल सुट्टी घेतलेली होती. आंदोलन सुरु झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कर्तव्यावर येण्यासाठी फोन आला मात्र, मी पुन्हा सुट्टी वाढवून घेतली असल्याचं या पठ्ठ्याने सांगितलं आहे.

अगं आई अहो आई आगामी झी 5 मराठीवरील वेब शो बद्दल अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मांडल खास मत

माध्यमांशी बोलताना मोहित म्हणाले, मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ड्यूटी जॉईंट करण्यासाठी फोर्स केला, परंतू मी आज सकाळीच नोकरीचा राजीनामा दिला आहे, नोकरी सोडून दिलीयं. मला नकोय ही नोकरी, मी परिपक्व आहे. मला सरकारी पगाराची गरज नाही, मी आता शेती करणार आहे. मला सरकारी गाडी, सराकारी घर, पगार नकोयं, असा सूर मोहितने लगावला आहे. तसेच मी माझ्या अनेक पोलिस मित्रांशी फोनवर बोललो, तुम्हाला मारताना हात कापला नाही का? असा थेट सवाल केला परंतू वरिष्ठांचे आदेश, दबाव असल्याने तेही काहीही करु शकले नसल्याचं त्यांनी सांगितल्याचं मोहितने सांगितलं आहे.

तसेच माझ्या घरी कोणत्याही गोष्टीची कमी नाही. आईने सांगितंल की विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्यानंतरच घरी ये. त्यामुळे मी पूर्णपणे सक्षम आहे. मला नोकरीची गरज नाही. मी पुढील काळात शेती करेल परंतू विद्यार्थ्यांना न्याय मिळायला हवा ही अपेक्षा मला असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. मी अनेक पोलिस बांधवांशी बोललो. ते सांगतात की एकाला मारल्यास दहा लोकं मागे सरकतील , त्यावर मी सांगितलं की, हे साक्षर लोकं मागे सरकणार नाहीत, त्यांना कायदा माहिती आहे ते कायद्याने लढतील, असंही मोहित म्हणाला आहे.

‘राजीनामा नको, मोदी, शाहांना बदलून टाकणार’; भर पावसात आंबेडकर मुंबईच्या रस्त्यावर, राज्यात कडकडीत बंद

पोलिस न्याय करु शकत नाहीत ते नोकरीसाठी सरकारला घाबरत आहेत. त्यामुळे ते न्याय करुच शकत नाही. आता पुढील निवडणुकीत मोदी सत्तेत आला तर तो देश विकून जाणार. या आंदोलनातून भगतसिंह, गांधी, आंबेडकर बाहेर निघतील. पुढे याच विद्यार्थ्यांमधून कोणीतरी न्यायाधीश बनणार , त्यानंतर कधी असं आंदोलन झाल्यास तो न्यायाधीश निकाल देणार तेव्हा सरकार कुठे जाणार? असा थेट सवाल मोहितने केला आहे. आंदोलनाची परिस्थिती सांभाळण्याच्या अनेक पद्धती आहेत परंतू हे म्हणजे विद्यार्थ्यांना टॉर्चर केलं आहे. दोन आंदोलनकांना मारा, म्हणजे बाकीचे बाजूला सरतील अशी पोलिसांची मानसिकता आहे. परंतू इथे दहा लोकांना मारलं तर वीस येतील अशी आंदोलकांची मानसिकता झाली असल्याचंही मोहितने स्पष्ट केलंय.

follow us