July Rules Change : दोन दिवसानंतर जुलै महिना सुरु होणार असून या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून देशात काही मोठे बदल होणार आहे. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य (July Rules Change) नागरिकांवर होणार आहे. जुलै महिन्यात रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते बँर्किंग सेवांपर्यंत बदल होणार आहे. तर जाणून घ्या 1 जुलैपासून देशात कोणते नियम बदलणार आहे.
रेल्वे तिकीट महाग होणार
जर तुम्ही रेल्वेने जुलै महिन्यात बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर 1 जुलैपासून तिकिटांचे भाडे (Railways Ticket) वाढण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, नॉन एसी कोचचे भाडे प्रति किलोमीटर 1 पैसे आणि एसी कोचचे भाडे प्रति किलोमीटर 2 पैसे वाढण्याची शक्यता आहे. लांब पल्ल्याच्या प्रवाशांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
तत्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलणार
तर दुसरीकडे तिकीट दलालांवर कारवाई करण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी आता आयआरसीटीसीने तत्काळ तिटीट बुकिंगमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 15 जुलैपासून फक्त आधार पडताळणी केलेल्यानंतर युजर्सला तत्काळ तिकीट बुक करता येणार आहे. आयआरसीटीसीने 15 जुलैपासून तिकीट बुकिंग करताना ओटीपी आधारित आधार पडताळणी अनिवार्य केले आहे. या निर्णयानंतर आता बुकिंग सुरु झाल्यानंतर एजटंना फक्त 30 मिनिटे तत्काळ तिकिटे बुक करण्याची परवानगी मिळणार आहे.
एटीएममधून पैसे काढणे महाग होणार
देशाची लोकप्रिय बँक आयसीआयसीआयने (ICICI) मोठा निर्णय घेत जुलै महिन्यापासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. या बँकेच्या ग्राहकांना एटीएममधून पैसे काढणे आता मर्यादित आणि महागडे होऊ शकते. मेट्रो शहरांमध्ये 3 मोफत व्यवहारांनंतर, प्रति रोख व्यवहार 23 आणि नॉन-कॅश व्यवहार 8.5 ची मर्यादा आहे, तर मेट्रो नसलेल्या शहरांमध्ये 5 मोफत व्यवहार मिळणार आहे.
मोठी बातमी, ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले पराग जैन रॉचे नवीन प्रमुख…
एलपीजी आणि जेट इंधनाच्या किमती बदलणार
तर दर महिन्याप्रमाणे या महिन्याच्या पहिल्या दिवशी देखील एलपीजी आणि विमान इंधनाच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीमध्ये कपात किंवा वाढ होण्याची शक्यता आहे.