Download App

आता आंब्यांची खरी चव चाखायला मिळणार! FSSAI कडून नवीन आदेश जारी

FSSAI :  उन्हाळा आला की आपल्याला सगळीकडे बाजारात आंब्याचा वास दरवळू लागतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बाजारात मोठ्या प्रमाणात केमिकलच्या मदतीने पिकवलेल्या आंब्यांची विक्री वाढली आहे. केमिकलच्या मदतीने पिकवलेल्या आंब्यांना नैसर्गिक पद्धतीने पिकलेल्या आंब्यांसारखी चव नसते. हीच बाब लक्षात घेत आणि ग्राहकांची होणारी फसवणूक लक्षात घेत FSSAI म्हणजेच अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने महत्वाचे आदेश जारी केले आहेत.

FSSAI च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आंबा पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर बंदी घातली आहे. कॅल्शियम कार्बाइड घातक वायू उत्सर्जित करते, ज्यामुळे अशा पिकवलेल्या आंब्याचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Direct Tax Collection : प्रत्यक्ष कर संकलनात केंद्राची मोठी उडी; जमा केले 16.68 लाख कोटी

FSSAI ने कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर किंवा विक्रीवर बंदी घालण्याच्या सूचना राज्यांना तसेच अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यानंतरही याचा वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा FSSAI कडून देण्यात आला आहे.

कॅल्शियम कार्बाइडच्या वापरामुळे काय होते?

बाजारात अनेकादा आंबा, पपई आणि केळी यांसारखी फळे पिकवण्यासाठी व्यापारी रसायनांचा वापर करतात. यातून घातक असा गॅस बाहेर पडतो. ज्यामुळे फळे लवकर पिकण्यास मदत होते. पण कॅल्शियम कार्बाइडमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरसचे कण असतात, जे आरोग्यासाठी घातक असतात. यामुळे चक्कर येणे, जास्त तहान लागणे, चिडचिड, अशक्तपणा, गिळण्यास त्रास होणे, उलट्या होणे आणि त्वचेवर फोड येणे अशा समस्या उद्भवू शकतात.

Infosys : मोहित जोशींचा इन्फोसिसला रामराम; आता देणार महिद्रांची साथ

FSSAI कडून ग्राहकांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी

वरील कडक इशाऱ्यासह FSSAI ने आंबा खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठीदेखील काही महत्वाची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यामध्ये आंबा किंवा इतर फळे खऱेदी करताना खात्री असणाऱ्या ठिकाणांवरूनच फळांची खरेदी करण्यास सांगितले आहे. याशिवाय कोणतेही फळ खाण्यापूर्वी ते चांगले धूण्यासचा सल्ला देण्यात आला आहे.

Tags

follow us