Download App

G20 Summit या परिषदेचा इतिहास आणि उद्देश काय? जाणून घ्या सविस्तर…

  • Written By: Last Updated:

G20 Summit : G20 परिषदेची शिखर परिषद आज 9 आणि 10 सप्टेंबरला दिल्लीत पार पडत आहे. भारताला पहिल्यांदाच या परिषदेचं यजमानपद मिळालं आहे. यासाठी जगभरातील अनेक दिग्गज नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. मात्र ही G20 परिषद नेमकी काय आहे? त्याची सुरूवात कशी झाली? यामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते? असे अनेक प्रश्न अनेकांना पडले असतील. या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ…

Maharashtra Politics : CM शिंदेंसह 16 आमदारांचं काय होणार? मोठी अपडेट मिळाली

G20 परिषद नेमकी काय आहे?

G20 हा 20 देशांचा समूह आहे. 1999 साली या परिषदेची स्थापना झाली. तर या देशांच्या एकत्र येण्यामागील उद्देश म्हणजे 1999 आधी काही वर्षांपासीन आशिया खंडातील देश आर्थिक संकटात होते. त्यासाठी जर्मीनीमध्ये G8 देशांची बैठक झाली आणि G20 ची स्थापना झाली. यामध्ये मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या अर्थमंत्री आणि केंद्रीय बॅंक गव्हर्नरला बोलवण्यात आले होते. त्यांनी जागतिक आर्थिक समस्यांवर तोडगा काढणे हा संघटनेचा उद्देश होता.

Jawan Box Office Collection: किंग खानच्या ‘जवान’ने विक्रम रचला! अवघ्या दोन दिवसांत केली ‘इतकी’ कमाई

या हे देश एकत्र येत जगातील आर्थिक आणि राजकीय प्रश्नांवर चर्चा करतात. जागतिक आर्थिक उत्पादनात 85 टक्के आणि व्यापारात 75 टक्के पेक्षा जास्त वाटा या देशांचा आहे. या वरून अंदाज येतो की, या परिषदेचा आणि त्यातील निर्णयांचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर किती मोठा परिणाम होत असेल. या देशांची दरवर्षी ही परिषद व्हायलाच हवी असंही नाही. त्यामुळे आता पर्यंत 24 वर्षांत 17 परिषदा झाल्या तर ही 18 वी परिषद दिल्लीत होत आहे.

G20 मध्ये कोण-कोणत्या देशांचा समावेश?

G20 हा 20 देशांचा समूह आहे. यामध्ये भारत, चीन, अमेरिका, रशिया, जपान, ब्रिटन, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इंडोनेशिया, दक्षिण अफ्रिका, सौदी अरेबिया, तुर्की, मेक्सिको, दक्षिण कोरिया, युरोपियन युनियन आणि अर्जेंटीना या देशांचा समावेश आहे. या देशांची एक प्रणाली आहे. त्यामध्ये नवीन अध्यक्ष निवडला जातो. तो त्यावर्षी तो देश G20 बैठका पार पाडतो. तर यावर्षी भरताकडे या परिषदेचं यजमानपद आहे. त्यामुळे भारतात. आधी या बैठका पार पडल्या आणि आता G20 परिषदेची शिखर परिषद आज 9 आणि 10 सप्टेंबरला दिल्लीत पार पडत आहे.

Tags

follow us