G20 Summit Video : भारत मंडपममध्ये साचले पाणी? कॉंग्रेसकडून जोरदार टीका; ‘विकास तरंगतो…’

G20 Summit : सध्या राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद (G20 Summit) सुरू आहे. या परिषदेत अनेक महत्वाचे करार झाले असून आज या परिषदेचा शेवटचा दिवस आहे. अनेक देशांचे प्रमुख हे आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या मायदेशी परतणार आहेत. त्यातच राजधानी दिल्लीत सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे दिल्लीतील अनेक भागात पाणी साचले आहे. G20 शिखर परिषदेचे ठिकाण असलेल्या […]

Ramdas Athwale Poem Opposing Is The Fashion Of Congress (7)

G20 Summit Video

G20 Summit : सध्या राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद (G20 Summit) सुरू आहे. या परिषदेत अनेक महत्वाचे करार झाले असून आज या परिषदेचा शेवटचा दिवस आहे. अनेक देशांचे प्रमुख हे आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या मायदेशी परतणार आहेत. त्यातच राजधानी दिल्लीत सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे दिल्लीतील अनेक भागात पाणी साचले आहे. G20 शिखर परिषदेचे ठिकाण असलेल्या इंडिया पॅव्हेलियनमध्ये पाणी साचल्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की पावसामुळे भारत मंडपममध्ये पूर आला आहे. यावर काँग्रेस पक्षाने सरकारवर सडकून टीका केली आणि कोट्यवधी रुपयांच्या उधळपट्टीचे हे दृश्य असल्याचे म्हटले आहे.

‘मला नाकारलं, अडचणी आणल्या, पण मी..,’; अखेर पंकजा मुंडेंनी खंत बोलून दाखवलीच… 

काँग्रेसने G20 शिखर परिषदेसाठी बांधण्यात आलेल्या भारत मंडपमचा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “पोकळ विकास उघड झाला आहे. G-20 साठी भारत मंडपम बांधण्यात आला. यासाठी गुंतवलेले 2700 कोटी रुपये एका पावसात वाहून गेले.

तर काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनींनी हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. सुरजेवाला यांनी लिहिले की, “आज 3000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या भारत मंडपम मध्ये थोड्याशा पावसातही विकासट तरंगताना दिसला!,अशी खोचक टीका केली. त्यांनी पुढं लिहिलं की, आज दिवसभरात जास्त पाऊस पडू नये म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतो, जी 20 परिषद सुरक्षित आहे. पूर्ण व्हावी, असं त्यांनी म्हटलं.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, आजही दिल्लीच्या अनेक भागात पाऊस सुरूच राहणार आहे.

 

 

Exit mobile version