‘मला नाकारलं, अडचणी आणल्या, पण मी..,’; अखेर पंकजा मुंडेंनी खंत बोलून दाखवलीच…
मला एवढ्या वेळा नाकारलं गेलं, एवढ्या वेळा अडचणी आणल्या गेल्या, परंतु मी अढळ राहिले, असल्याची खंत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे(BJP Leader Pankja Munde) यांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरु आहे. काल मुंडे बीडमध्ये दाखल झाल्या. यावेळी त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या, माझ्याकडे जे काम दिलंय ते मी करत असते. मध्य प्रदेशची जबाबदारी दिली ती मी पार पाडते आहे. या गोंधळातून बाजूला होवून विचार केला पाहिजे, म्हणून मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेक घेते असं सांगणं सोपं नसतं. कोण कसा आहे ते जनतेला चांगलं माहिती असतं. गढूळ वातावरणात तुरटीचं काम करण्याची माझी इच्छा असल्याचं मुंडे म्हणाल्या आहेत.
डेव्हिड वॉर्नरने 85 चेंडूत ठोकले शतक, सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडला
तसेच आम्हाला तोल ढळू द्यायचा नाही. मला एवढ्या वेळा नाकारलं गेलं.. एवढ्या वेळा अडचणी आणल्या गेल्या परंतु मी अढळ राहिले. माझ्या कार्यकर्त्यांनीही तोल ढळू द्यायचा नाही, अशीही खंत पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली आहे. मी महाराष्ट्रात शिवशक्ती परिक्रमा सुरु केलेली आहे. राज्यामध्ये मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कदाचित बीड जिल्ह्याला वाटलं आपण कमी पडू नये म्हणून एवढं जंगी स्वागत करण्यात आलं, असल्याचंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, पंकजा मुंडे शिवशक्ती परिक्रमा यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. काही दिवसांपासून मुंडे यांनी राजकारणातून ब्रेक घेतल्याचं बोललं जात होतं. मात्र, ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचं दर्शन घेण्यासाठी त्यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरु केली असून त्यांना राज्यातून चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे.
मी वारंवार पोटतिडकीनं सांगतेय की मराठा समाजाला शब्द नको आहे. मराठा समाजाला दिशाभूल नको आहे. त्यांना खरं आरक्षण हवं आहे. हे आरक्षण किती बसेल, कसं बसेल याचा आराखडा सरकारकडे असतो. ते विश्वासाने व हिंमतीने त्यांच्याशी चर्चा करून करायला हवं असं मला वाटतं, असल्याचं भाष्य त्यांनी मराठा आरक्षणावर केलं.