G20 Summit : इकॉनॉमिक कॉरिडॉरची घोषणा; चीनच्या वर्चस्व मोडीत; आता युरोप आणि भारत यांच्यात होणार व्यापार

  • Written By: Published:
Ramdas Athwale Poem Opposing Is The Fashion Of Congress (6)

G20 Summit : सध्या राजधानी दिल्लीत G-20 शिखर परिषद (G20 Summit) सुरू आहे. या शिखर परिषदेच्या व्यासपीठावरून भारत-मध्य-पूर्व-युरोप कनेक्टिव्हिटी इकॉनॉमिक कॉरिडॉरची (Economic Corridor) ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. हा कॉरिऑर भारताला मध्य पूर्व आणि युरोपशी जोडेल. हा कॉरिडॉर जागतिक व्यापारासाठी गेम चेंजर ठरू शकतो. त्यामुळं या प्रकल्पाची घोषणा चीनसाठीही एक महत्त्वाचा संदेश आहे.

सध्या 8 देश या आर्थिक कॉरिडॉरचा भाग आहेत. या कराराचे अनेक फायदे आहेत आणि ते 10 वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इकॉनॉमिक कॉरिडॉरचे महत्त्व स्पष्ट केले. म्हणाले- पंतप्रधान मोदींनी एक पृथ्वी, एक भविष्य आणि एक कुटुंब असे सूत्र दिले. त्यांचे आभार. तर आज आपण सर्व एका महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक भागीदारीपर्यंत पोहोचलो आहोत. आगामी काळात भारत, पश्चिम आशिया आणि युरोपच्या आर्थिक एकात्मतेसाठी हे एक प्रभावी माध्यम बनेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, यावेळी जी-20 शिखर परिषद एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या थीमवर केंद्रित आहे. या परिषदेत शाश्वत, लवचिक पायाभूत सुविधा निर्माण करणे, दर्जेदार पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे आणि चांगले भविष्य निर्माण करण्यावर भर देण्यात आला. मोदी म्हणाले की, हा कॉरिडॉर संपूर्ण जगाला सतत रस्ता दाखवेल.

चंद्रयान-2 ने घेतला चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरचा फोटो, ‘चंद्रावरच्या अंधारात कैद झाले सुंदर दृश्य’ 

अमेरिका अंगोला येथून नवीन रेल्वे मार्ग बांधणार
अंगोला ते हिंदी महासागरापर्यंत नवीन रेल्वे मार्गावर अमेरिका गुंतवणूक करणार असल्याचे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सांगितले. यामुळे रोजगार निर्मिती होईल आणि अन्न सुरक्षा वाढेल, असे ते म्हणाले. त्याच वेळी, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान म्हणाले की, सौदी अरेबिया या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी उत्सुक आहे. त्याच वेळी, युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन यांनी सांगितले की, भारत, मध्य पूर्व आणि युरोप यांच्यातील हा सर्वात थेट संबंध असेल. त्यामुळे प्रवास 40 टक्के जलद होईल.

सध्या या देशांचा या करारात समावेश
भारत, संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, युरोपियन युनियन (EU), इटली, जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिका या देशांचा या करारात समावेश आहे.

 विशेष वैशिष्ट्ये
अमेरिका, सौदी अरेबिया, युरोपियन युनियन, यूएई आणि इतर युरोप आणि भारत यांच्यातील व्यापार वाढवण्यासाठी हा कॉरिडॉर मैलाचा दगड ठरणार आहे. गरीब आणि मध्यम उत्तन्न देशांना याचा फायदा होईल. शिवाय, मध्यपूर्वचा प्रदेश भारत आणि युरोपशी थेट ट्रेननेच नव्हे तर दरांच्या माध्यमातूनही जोडला जाईल. याचा सर्वांना फायदा होईल.

Tags

follow us