Download App

G20 Summit ची अशीही चर्चा; PMO परिसरात माकडांना हाकलवण्यासाठी कुटुंब कमावतं महिन्याला 20 हजार रूपये

  • Written By: Last Updated:

G20 Summit : शनिवार 9 सप्टेंबर आणि रविवार 10 सप्टेंबर या दोन दिवस राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद (G20 Summit) सुरू होती. या परिषदेत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi)या बैठकीचा समारोप केला. या परिषदेमध्ये सर्वच गोष्टींची चर्चा झाली. त्यामध्ये परिषदेदरम्यान उभारलेल्या ‘भारत मंडपम’, कोणार्क चक्र, राष्ट्रपतींच्या मेजवाणी, यांसोबत आणखी एका गोष्टीचा चर्चा झाली ती म्हणजे एका चक्क माकडं हाकलवण्याची नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीची नेमका काय आहे हा प्रकार जाणून घेऊ…

Maratha Reservation वर आज सर्वपक्षीय बैठकीत तोडगा निघणार? फडणवीस म्हणाले…

माकडांना हाकलवण्याचे मिळतात 20 हजार रूपये…

दिल्लीमध्ये इंडिया गेट, लाल किल्ला, कर्तव्य पथ कॅनॉट प्लेस आणि नुकत्याचं झालेल्या G20 शिखर परिषद परिसरात माकडांचा प्रचंड त्रास आहे. या माकडांच्या झुंडीच्या झुंडी या परिसरात लोकांना त्रास देतात. या परिसरांमध्ये व्हिव्हिआयपी लोकांचे निवासस्थान आहेत. तर या माकडांना हाकलवण्यासाठी 42 वर्षीय गुल खान यांचे वडील वानरांचा वापर करून माकडांना हाकलवून लावत. मात्र त्यानंतर त्यावर बंदी आली. त्यामुळे गुल खान यांनी एक युक्ती लढवली त्यांनी वानराचा आवाज काढून त्यांनी माकडांना हाकलवायला सुरूवात केली.

काल दिल्लीला अन् आज भीमाशंकरला…. मुख्यमंत्री तीर्थयात्रेतच व्यस्त; संजय राऊतांचे टीकास्त्र

त्यांची ही कला पाहून प्रशासनाने त्यांना हेच काम दिलं. त्यांच्या सारखे अनेक लोक या परिसरामध्ये हे माकडांना हाकलवण्याचं काम करतात. त्यात आता G20 शिखर परिषद परिसरात विविध देशांचे प्रमुख आणि प्रतिनिधी येणार होते. त्यांना यामुळे त्रास होऊ नये म्हणून दिल्ली आणि केंद्र सरकारने माकड हाकलवण्यासाठी काही लोकांना ड्युटीवर नेमले होते.

वानराचा आवाज काढून माकडांना हाकलवलं

यासाठी या लोकांना सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत ड्युटी करण्यास सांगितले होते. सरकारने G20 शिखर परिषदेसाठी त्यांना अत्यावश्यक सेवेअंतर्गत नेमले होते. त्यांना या कामासाठी 20 हजार रूपये महिना या प्रमाणे पगार मिळतो. तर गुल खान यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे वडील हे माकड आणि अस्वलांचे खेळ करत आजोबांचाही हाच व्यवसाय होता. वडील कुटुंबासह दिल्ली आले. मी देखील हा खेळ शिकलो. रस्त्यावर खेळ करायचो त्यातून पोलीस अधिकाऱ्यांशी ओळख झाली. विदेश मंत्रालयात माकडं हाकलवण्याचं काम मिळालं. वानरांचा वापर करून माकडांना हाकलवून लावण्यावर बंदी आल्यानंतर वानराचा आवाज काढून त्यांनी माकडांना हाकलवायला सुरूवात केली. त्यानंतर अशा लोकांची मागणी वाढली मग त्यांना ट्रेनिंग देऊन खान यांच्या परिवारातील लोकांनी देखील सरकारी कार्यालयात हे काम सुरू केले.

तयारीचे आदेश आले! विधानसभेसाठी पुण्यातून पवारांचा हुकमी एक्का मैदानात उतरणार

दिल्ली महानगर पालिकेशी माकड हाकलवण्याचा करार...

दिल्लीतील विविध परिसरात असे 100 लोक आहेत. जे वानराचा आवाज काढून माकडांना हाकलवण्याचं काम करतात. त्यासाठी दिल्ली महानगर पालिकेशी त्यांचा 1 वर्षांचा करार असतो. दरवर्षी त्यांचा हा करार रिन्यू केला जातो. त्यांना या कामासाठी 20 हजार रूपये महिना या प्रमाणे पगार मिळतो. तसेच या माकडांना हाकलवण्यासाठी माणसांचा वापर केला जातो. कारण माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी काही उपाय केले त्यात त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला तर प्राणी संरक्षण कायद्यान्वये तो गुन्हा ठरेल. तसेच प्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल.

Tags

follow us